बारामती : ऊस वाहतूक ट्रॅक्टर बायो-सीएनजी गॅसवर चालविण्याचा प्रयोग

वाहनांमध्ये विकसित झालेली नवनविन टेक्नाॅलाॅजी स्वीकारताना आता ग्रामीण भागही पुढे येऊ पाहत आहे.
ऊस वाहतूक ट्रॅक्टर बायो-सीएनजी गॅसवर चालविण्याचा प्रयोग
ऊस वाहतूक ट्रॅक्टर बायो-सीएनजी गॅसवर चालविण्याचा प्रयोगSakal
Updated on

माळेगाव : शेती आणि शेतीपुरक व्यवसाय करताना कमी खर्चात अधिकचे दोन पैसे मिळविल्या शिवाय शेतकरी, मजूरांसह वाहन चालकांना पर्याय उरला नाही, त्या उद्देशाने वाहनांमध्ये विकसित झालेली नवनविन टेक्नाॅलाॅजी स्वीकारताना आता ग्रामीण भागही पुढे येऊ पाहत आहे. त्याचे उत्तम उदाहरण सध्या माळेगाव साखर कारखान्यावर पहावयास मिळत आहे. या कारखाना प्रशासनाने ऊस वाहतूक खर्चात बचत होण्याच्या पार्श्वभूमिवर ट्रॅक्टर सी.एन.जी. किट बसवून वाहतूकदार यांच्या खर्चात बचत करण्याचा प्रायोगिक तत्वावर प्रयोग केला आहे. इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर कारखाना आणि वाहतूकदार या दोघांसाठी हा पर्याय क्रांतिकारक ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नुकतीच या ट्रॅक्टरची पाहणी केली.

व्हीएसआय मांजरी येथे माजी केंद्रीय कृषी मंत्री शदर पवार यांच्या अध्यक्षतेखाली २ जुलै रोजी अॅग्रीकल्चर सॉलिड वेस्ट व इंडस्ट्रियल सॉलिड वेस्ट यांच्यापासून साखर कारखाना स्तरावर बायो -सीएनजी उत्पादन मिळविण्याकरिता वेबिनार झाला होता. त्यामध्ये बायो - सीएनजी प्रकल्प उभारणे करिता संबंधित कंपन्यांनी सहभागी कारखांदार प्रतिनिधींना सदर प्रकल्पाची टेक्निकल माहितीचे सादरीकरण करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमिवर माळेगाव सहकारी संचालक मंडळाने डिस्टिलरी बायोगॅस पासून बायो -सीएनजी प्रकल्प उभारण्याची मानसिकता केली आहे.

ऊस वाहतूक ट्रॅक्टर बायो-सीएनजी गॅसवर चालविण्याचा प्रयोग
हेलिकॉप्टर दुर्घटना : CDS रावत यांच्या जाण्यानं अपरिमित हानी - राजनाथ सिंह

त्याचाच एक भाग म्हणून प्रायोगिक तत्वावर कारखाना प्रशासनाने प्रत्येक गटातील एका सभासद वाहतूकदारांच्या ट्रॅक्टरला मोफत बायो- सीएनजी किट ( रेट्रो फिटमेन्ट किट) बसविण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार पहिले किट पणदरे येथील ऊस वाहतूकदार शहाजी लकडे यांच्या ट्रॅक्टरला बसविण्यात आले आहे. या प्रयोगाची पहाणी सोमवार (ता.६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात केली. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष बन्शीलाल आटोळे संचालक नितीन सातव, अनिल तावरे, योगेश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते. सहा गटातील सहा ट्रॅक्टरवर केलेला हा प्रयोग यशस्वी होताच कारखाना स्वतः बायो-सीएनजी गॅसची निर्मिती करणार आहे.

ट्रॅक्टर सी.एन.जी. किटची माहिती :-

ट्रॅक्टर सी.एन.जी. किटला ड्युअल फ्युएल सिस्टिम आहे., सीएनजी किट मूळ किंमत रु. १. ३२ लाख आहे. सदर ट्रॅक्टर पूर्ण क्षमतेने (लोडवर - २५ टन) डिझेलवर ३. ५ किलो मीटर मायलेज देते आणि सी.एन.जी. किट बसविल्यानंतर ४.५ ते ५ किलोमीटर मायलेज देते., सी.एन.जी. टॅंक वॉटर कॅपॅसिटी ६० लिटर असून, त्यामध्ये १० किलो सी.एन.जी.बसतो., सदर किट डिझेल व सी.एन.जी. रेशो 30 % डिझेल व 70 % सी.एन.जी. राहील., सदर किट मुळे इंधन (३५ ते ४० % इंधन) बचत होईल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल., सदर किट मुळे शेतकरी सभासद व वाहतूकदार यांच्या खर्चात बचत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com