Ajit Pawar : देशात आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने बारामती तालुका पुढे आणणार

बारामती लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर माळेगाव बुद्रूक येथे अजित पवार यांची जाहिर सभा पार पडली.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal

माळेगाव - 'देशात आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने बारामती तालुका पुढे आणून दाखविण्याचा मी निर्धार केला आहे. बारामती शहराच्या तुलनेत माळेगाव नगरपंचायत हे शहर नव्याने विकसित होऊ पाहत आहे. माळेगावच्या सर्वांगिण विकासासाठी आणि प्रस्तावित कामांसाठी सुमारे तीनशे कोटींपेक्षा अधिकचा निधी आगामी अर्थसंकल्पात मंजूर करण्याचा माझा प्रय़त्न राहिल.

त्यापैकी पहिल्या टप्प्यात शासनस्तरावर माळेगावच्या मुलभूत सेवासुविधा पु्र्णत्वाला आणण्यासाठी  २० कोटी रुपयांचा निधी वर्गही केला आहे. बांधवांनो मी तुमचे भले करतो, तुम्ही माझा लोकसभेचा उमेदवार निवडून द्या, ` असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात केले. यावेळी उपस्थितांनी घोषणाबाजी आणि टाळ्यांचा कडकडाट करीत पवार यांच्या भूमिकेला पाटींबा दिला.

बारामती लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर माळेगाव बुद्रूक येथे अजित पवार यांची जाहिर सभा उशीरा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. पावसाळा येईपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतीचे पाणी कमी पडू देणार नाही, सहविजनिर्मिती प्रकल्पाचा वीज दर प्रती युनिट सहा रुपये केला, एफआरपीपेक्षा अधिकचा ऊस दर देण्यास माळेगाव व सोमेश्वर साखर कारखाने कटिबद्ध आदी मुद्ये पुढे करीत अजित पवार यांनी उपस्थितांना आपलेसे केले.

ते म्हणाले, 'देशात आणि महाराष्ट्रात एका विचाराचे सरकार असल्यानंतर निधी उपलब्ध करण्यास कोणतीच अडचण येत नाही. मी जर राज्यसरकारमध्ये सहभागी झालो नसतो, तर बारामतीमध्ये हजारो कोटी रुपयांची कामांवर स्थगिती कायम राहिली असती.

नीरा नदीला पाणी सोडता आले नसते, प्रलंबित विकास कामांची दैयनिय आवस्था झाली असती. हे विधारक चित्र आपल्याला परवडले नसते, म्हणूनच मी व माझ्या सहकाऱ्यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सरकारमध्ये आपल्याकडे वित्तविभागाची जबाबदारी आली आणि बारामती तालुक्यात पुन्हा विकासाची घौडदौड सुरू झाली.

नविन बस स्थानक, कऱ्हा नदीमधील सुशोभिकरण झाले, पोलिस मुख्यालय आशी अनेक विकास कामे पुर्णत्वाला आली.तसेच नविन रस्ते, दिवाबत्ती, सांडपाण्याच्या सुविधा, आरोग्य व शिक्षणाची दालने उभी राहत आहेत. त्यामुळे माळेगावकरांनो तुम्ही भावनिक न होता विकासाच्या बाजूने कौल द्या, नक्की मी तुमचे माळेगाव शहर अद्ययावत आणि सुंदर बनवितो,' असे आश्वासन पवार यांनी दिले.

यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, दिपक तावरे, विश्वास देवकाते, रणजित तावरे, पोपटराव गावडे, दत्तात्रेय येळे, अॅड. राहूल तावरे, अविनाश गोफणे, रविराज तावरे, संजय भोसले, जयदीप तावरे, संभाजी होळकर, सचिन सातव, वसंतराव तावरे, धनवान वदक, विलास तावरे, रमेश गोफणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन प्रा.अनिल धुमाळ यांनी केले.

दादा..तुम्ही मुख्यमंत्री व्हा, नगराध्यक्ष नको..!

अजित पवार म्हणाले, की माळेगाव नगरपंचायतीमध्ये गटतटाचे राजकारण खूप आहे. त्याचा माझ्या राजकारणाला त्रास होतो. माळेगाव नगरपंचायतीमध्ये पहिला नगराध्यक्ष होण्यासाठी येथे प्रचंड स्पर्धा आहे. कधीकधी मलाही वाटते, की या माळेगावच्या मतदार यादीत माझे नाव घालून पहिला नगराध्यक्ष व्हावे.

पवारांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये एकच हस्स्य कल्लोळ उडाला. दादा.. तुम्ही मुख्यमंत्री व्हा, नगराध्यक्ष नको असा उपस्थितांमधून आवाज आला. त्यावर दादांही आगोदर लोकसभेसाठी माझा उमेदवार निवडणूक द्या, पुढचे पुढे बघू असे म्हणून या विषयावर पडदा टाकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com