esakal | अतिवृष्टीने, दुष्काळी बारामतीतील मर्यादा केल्या स्पष्ट 
sakal

बोलून बातमी शोधा

अतिवृष्टीने, दुष्काळी बारामतीतील मर्यादा केल्या स्पष्ट 

बारामती शहर व तालुक्यात बुधवारी (ता. 14) अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसाने अनेक मर्यादा तर स्पष्ट केल्याच पण भविष्यात पुन्हा असे अस्मानी संकट आल्यास किती संकटे उद्भवू शकतात याची झलकही दाखवली. दुष्काळी समजल्या जाणा-या बारामती तालुक्यात असा पाऊस ऐतिहासिक असाच मानला जात आहे. बारामतीत 24 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

अतिवृष्टीने, दुष्काळी बारामतीतील मर्यादा केल्या स्पष्ट 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती - शहर व तालुक्यात बुधवारी (ता. 14) अक्षरशः ढगफुटीसारखा पाऊस झाला. या पावसाने अनेक मर्यादा तर स्पष्ट केल्याच पण भविष्यात पुन्हा असे अस्मानी संकट आल्यास किती संकटे उद्भवू शकतात याची झलकही दाखवली. दुष्काळी समजल्या जाणा-या बारामती तालुक्यात असा पाऊस ऐतिहासिक असाच मानला जात आहे. बारामतीत 24 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सरकारी निकषांनुसार एका दिवसात 65 मिलीमीटरहून अधिक पाऊस झाल्यास ती अतिवृष्टी समजली जाते. या आकडेवारीवरूनच किती प्रचंड पाऊस या पट्ट्यात झाला याची कल्पना येते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील अनेक ओढे बुजलेले किंवा बुजवले असल्याने पाणी जायला जागा नसल्याने वाट दिसेल तिकडे पाणी घुसल्याने अचानक अनेक ठिकाणी पाण्याचे प्रवाह निर्माण झाले. भिगवण रस्त्यावर अमरदीप हॉटेल परिसरातून पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की त्याला वाट काढून देण्यासाठी डिव्हाईडर फोडावा लागला, परिणामी एका हॉस्टिपटलच्या बेसमेंटमध्ये पाणी वेगाने घुसले. शहरातील जवळपास सर्वच बेसमेंटमध्ये पाणी आल्याने अनेकांची दाणादाण उडाली.

सिगारेट ओढण्यास नकार दिल्याने जीवे मारण्याची धमकी; तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अनेकांच्या मालाचे कागदपत्रांचे यामुळे नुकसान झाले. मोठा पाऊस झाला की बारामतीतील रस्त्यांवरही तळी साचतात, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी रस्ते करताना कसलाही विचारच केलेला नसल्याची बाब दरवर्षी पावसाळ्यात समोर येते. गेल्या पावसाळ्यातील पुरानंतर वाहून गेलेली संरक्षक भिंत अजूनही उभी राहिली नसल्याने यंदाही पुराचे पाणी इस्ततः घुसले. पुर नियंत्रण रेषेचे उल्लंघन करुन अनेकांनी घरे उभारतानाच त्यांना रोखले गेले असते तर अनेकांच्या घरात पाणी शिरण्याचा प्रश्न निर्माण झाला नसता. यंदा नदीची स्वच्छता करण्यात आली होती त्या मुळे पाणी वेगाने वाहून गेले, नुकसानीची तीव्रता त्या मुळे कमी झाली. 

Pune Rain : अनेकांसाठी ठरली रात्र वैऱ्याची; पाणी घरांत घुसल्याने नागरिकांना भरली धडकी

कायमस्वरुपी निवारा केंद्र हवे 
विविध आपत्तीच्या काळात तसेच पालखी काळात वास्तव्यासाठी एक कायमस्वरुपी निवारा केंद्र उभारण्याची आता गरज निर्माण झाली आहे. एकाच वेळेस या निवारा केंद्रात लोकांची सोय करता आली पाहिजे, स्वच्छतागृहांसह वीज, पिण्याच्या पाण्याची सुविधा दिल्यास स्थलांतराच्या वेळेस त्याचा उपयोग होऊ शकेल. 

साधने असूनही स्मार्ट सिटी मागे

बारामती तालुक्यात बुधवारी (ता. 14) झालेला पाऊस मि.मी. मध्ये खालीलप्रमाणे. 
बारामती - 170  
उंडवडी क.प - 130 
सुपे - 140  
लोणी भापकर - 107  
माळेगांव कॉलनी - 138  
वडगांव निं - 130 
पणदरे - 109  
मोरगांव - 106  
लाटे - 115  
बऱ्हाणपूर - 154  
सोमेश्वर कारखाना - 127 
जळगांव क.प - 137  
होळ 8 फाटा - 124.4  
माळेगांव कारखाना - 97  
मानाजीनगर -  115  
काटेवाडी - 156 
अंजनगाव - 140  
जळगांव सुपे - 129 
के.व्ही.के - 132.6  
सोनगाव - 151 
कटफळ - 179  
सायंबाचीवाडी - 125  
चौधरवाडी - 82.3  
नारोळी - 64.6 
काऱ्हाटी - 69  
गाडीखेल - 166

Edited By - Prashant Patil