सावधान! आपण बिबट प्रवण क्षेत्रात आहात

काही दिवसांपूर्वी कात्रज घाटात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसल्याची घटना घडली होती. त्यानंतर गुजर-निंबाळकरवाडीतील वनक्षेत्र हद्दीत बिबट्या दिसून आला होता.
Katraj Ghat Board
Katraj Ghat BoardSakal
Summary

काही दिवसांपूर्वी कात्रज घाटात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसल्याची घटना घडली होती. त्यानंतर गुजर-निंबाळकरवाडीतील वनक्षेत्र हद्दीत बिबट्या दिसून आला होता.

कात्रज - काही दिवसांपूर्वी कात्रज घाटात (Katraj Ghat) महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बिबट्या (Leopard) दिसल्याची घटना घडली होती. त्यानंतर गुजर-निंबाळकरवाडीतील वनक्षेत्र हद्दीत बिबट्या दिसून आला होता. त्यानंतर कात्रज घाटात खेड-शिवापूर वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांकडून जनजागृती (Public Awareness) करत फलक (Board) लावण्यात आले आहेत. या फलकांवर 'सावधान! आपण बिबट प्रवम क्षेत्रात आहात' अशा आशयाचा मजकूर लिहण्यात आला आहे.

कात्रज घाटातील भिलारेवाडी, मांगडेवाडी आणि गुजर-निंबाळकरवाडीच्या महसूली हद्दीत गेल्या वर्षभरापासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागामार्फत कात्रज घाट रस्ता व तसेच गाव परिसरामध्ये बिबट्याच्या वावराबाबत जनजागृतीसाठी फलक लावण्यात आले आहेत. यावेळी रात्री-अपरात्री जंगल परिसरात नागरिकांनी फिरू नये. तसेच, जंगली प्राणी दिसल्यानंतर काय करावे व काय करू नये अशा आशयाच्या सूचना फलकांवर लिहण्यात आल्या आहेत. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वनपाल समीर इंगळे, वनरक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com