आधुनिकपेक्षा आदर्श बना - राज्यपाल कोश्‍यारी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 January 2021

‘आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी प्रयत्न करा. आधुनिकीकरण झाले म्हणून आपली मातृभूमी, मातृभाषा आणि संस्कृतीला विसरू नका. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेचा आग्रह धरा,’’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी केले.

पुणे - ‘आपण सर्वजण आधुनिकीकरणाचा ध्यास घेऊन वाटचाल करत आहोत. परंतु, केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी प्रयत्न करा. आधुनिकीकरण झाले म्हणून आपली मातृभूमी, मातृभाषा आणि संस्कृतीला विसरू नका. नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेचा आग्रह धरा,’’ असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर, सोसायटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. श्‍यामकांत देशमुख, सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव उपस्थित होते. ‘सेंट्रल सॉफिस्टिकेटेड ॲनालॅटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी’ आणि ‘प्रिन्सिपल व्हर्च्युअल केबिन’चे डिजिटल स्वरूपात अनावरण केले. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विशेषांकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. 

आई-पप्पा माफ करा, आत्महत्या करतेय; तरुणीने फेसबुकवर पोस्ट केली आणि...

कोश्‍यारी म्हणाले, ‘नावीन्यपूर्ण गोष्टींचे ज्ञान ग्रहण करून विद्यार्थ्यांनी विद्वान बनावे. भारत हा प्राचीन काळापासून अनेक गोष्टींमध्ये अग्रेसर देश आहे. भविष्यात देखील आपण सर्वांत पुढे राहू. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा देशहितासाठी उपयोग करावा. नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करावेत, असे सांगून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये आजवर अनेक विद्यार्थ्यांनी नावलौकिक मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व संस्थेचे कौतुक केले.

कुलगुरू डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना आवश्‍यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना दर्जेदार शिक्षण देणे तसेच त्यांना आपल्या शैक्षणिक संस्थेत टिकवून ठेवणे हे आव्हान असते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेत चांगल्या संकल्पना व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत येतात. 

सिरमच्या लसीचा वाद कोर्टात; 'कोव्हिशिल्ड'बाबत कंपनीचे स्पष्टीकरण

‘दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आमची संस्था नेहमीच भर दिला आहे. परंतु संस्थांना स्वायत्तता दिल्यानंतर त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार काम करण्याची संधी दिली जात नाही’ अशी खंतही डॉ. गजानन एकबोटे यांनी व्यक्त केली. 
संस्थेच्या वाटचालीचे प्रा. डॉ. अंजली सरदेसाई यांनी सादरीकरण केले. प्राचार्य झुंजारराव यांनी आभार मानले. 

स्वायत्तता आहे तर अडवणूक नको 
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) गुणवत्ता व क्षमता असलेल्या महाविद्यालयांना स्वायत्तता देऊ केली आहे. तरीही शासनस्तरावरून अडवणूक केली जात असल्याने या स्वायत्ततेचा उपयोग करता येत नाही. महाविद्यालयांना पूर्ण क्षमतेने काम करू दिले पाहिजे असे डॉ. गजानन एकबोटे यांनी सांगितले. त्यावर राज्यपाल कोश्‍यारी आणि कुलगुरू करमळकर यांनीही सहमती दर्शविली.

Edited By - Prashant Patil

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Be more ideal than modern bhagat singh koshyari