
पुणे : घोड्याच्या रेसवर पैसे लावण्यासाठी कायदेशीर पावती मागणाऱ्याससह त्यांच्या मुलाला स्टॉलवरील नागरिकाने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यानंतर, त्यांच्याकडील अडीच लाख रुपयांची रोकड चोरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकास अटक केली आहे.
सलाउद्दीन जहीरुद्दीन शेख (वय 52, रा. मेहरअलीगंज, एनआयबीएम रोड, कोंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मुंबईतील 59 वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणतात, माहिती द्या बघतोच...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुळचे मुंबई येथील रहिवासी आहे. रविवारी ते त्यांच्या मुलासह त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी रेसर्कोस येथे आले होते. दरम्यान, रेसकोर्सच्या ठिकाणी मुंबईची रेस चालू असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी तेथे जाऊन आर. एस. असोसिएटस् या स्टॉलवर घोड्यांच्या रेसवर पैसे लावायचे होते. त्यांनी पैसे भरण्यापुर्वी त्यांनी 28 टक्केची कायदेशीर पावती देण्याची मागणी स्टॉलवरील सलाउद्दीन शेख याच्याकडे केली. त्यावेळी शेख याने त्यांना पावती देण्यास नकार दिला. फिर्यादी यांनी त्यास कायद्याने पावती देणे बंधनकारक असल्याचे सांगितले. त्यावरुन दोघांमध्ये भांडणे झाली. त्यानंतर शेख याने फिर्यादी यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. स्टॉलवरुन खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या खिशातील अडीच लाख रुपये काढून घेण्यात आले.
पुणे : आईला मोबाईलवरून 'बाय बाय' म्हणत विवाहितेने केली आत्महत्या
शेख यांच्यासह इतर लोकांनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला मारहाण करीत धक्काबुक्की करुन त्यांना तेथून बाहेर काढले. त्यानंतर फिर्यादी हे सुरक्षारक्षकांच्या केबीनमध्ये गेले, त्यावेळी तेथेही आरोपीने त्यांना मारहाण करीत धमकी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.