esakal | दहावीनंतरचा उत्तम पर्याय : 6 वर्षाचा इंटिग्रेटेड पदवी अभियांत्रीकी अभ्यासक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

pune

दहावीनंतरचा उत्तम पर्याय : 6 वर्षाचा इंटिग्रेटेड पदवी अभियांत्रीकी अभ्यासक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दहावी-बारावी विद्यार्थ्यांचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे, आपल्या राज्यात प्रवेश प्रक्रियेचे काम अत्यंत वेगाने चालू आहे. दहावी हा विद्याथर्यांच्या करीअरचा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो, कोणती शाखा निवडायची, प्रवेश कुठे होणार, दहावीनंतर नेमके काय करायचे असे अनेक प्रश्न सध्या पालक आणि विद्यार्थी यांच्या विचारात घर करुन बसले आहेत. अशा पार्श्वभुमीवर आपल्या आवडीचे व चाकोरी बाहेरील क्षेत्रातील संधीची मी आपणास अल्पशी माहीती देण्याचा प्रयत्न करत आहे. दहावीनंतर विद्यार्थी विज्ञान, कला, वाणिज्य या आपल्या पारंपारिक शाखेकडे जातो.

विज्ञान शाखेचे विद्यार्थी 11वी आणि 12 वी ला जाऊन अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी लागणार्‍या प्रवेश परिक्षा जेईई, एमएच-सीईटी मार्फत अभियांत्रिकीला प्रवेश घेतात. परंतु प्रत्येकला त्यांच्या मनासारखी शाखा व महाविद्यालय मिळणे फार अवघड असते. म्हणून मिळालेल्या महाविद्यालयावर समाधान मानून आपले करिअर घडवावे लागते. दुसरा पर्याय म्हणजे दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेणे व अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश घेणे पण एआयसीटीई च्या नियमानुसार फक्त 10 टक्के जागांवर आपणाला केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश दिला जातो व जे महाविद्यालय मिळेल त्यात समाधान मानून आपले करिअर करावे लागते. या प्रवेशासाठी विद्यार्थ्याला तीव्र स्पर्धेला सामोरे जावावे लागते.

यावर्षी राज्यामध्ये दहावीला साधारणत: 16 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि राज्यात 11 वी विज्ञानला एकंदरीत 5.5 लाख जागा उपलब्ध आहेत, दहावी हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्वाचा टप्पा मानला जातो. या वयापासून म्हणजे साधारण 15 ते 16 वर्षापासून आपल्याला दहावीनंतर अभियांत्रिकी शिक्षणाची सोय आपल्या राज्यात काही विद्यापीठामध्ये सुरु करण्यात आलेली आहे. मित्रहो, आपणाला जरआपले उज्वल भविष्य वयाच्या 15-16 वर्षापासून म्हणजेच दहावीनंतर अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रवेश करायचा असेल तर आपल्यासमोर एक उत्तम पर्याय म्हणजे सहा वर्षाचा इंटिग्रेटेड पदवी अभियांत्रीकी अभ्यासक्रम.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरच दुकाने सुरु होणार, व्यापारी महासंघाची भूमिका

भारत हा एक विकसनशील देशआहे. अभियांत्रिकी क्षेत्रात सध्या अतिशय वेगाने बदल घडत आहेत. जसे मेक इन इंडिया, डिजीटल भारत, स्किल इंडिया, स्टार्ट-अप इंडिया व आपल्या पारंपारिक अभ्यासक्रमाबरोबरच म्हणजे कॉम्प्युटर सायंस अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग, (कृत्रिम बुध्दीमत्ता आणि डेटा सायन्स), मेकॅनिकल इंजिनिअरिंग, (रोबोटिक्स अ‍ॅण्ड अ‍ॅटोमेशन), इलेक्ट्रॅनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, सिव्हिल इंजिनिअरिंग, (स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर) या शाखेमध्ये दहावीनंतर सहा वर्षाचा अभियांत्रिकी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

मित्रहो, आपणांस कल्पना आहे, एज्युकेशन 4.0 अ‍ॅण्ड इंडस्ट्री 4.0 प्रमाणे आपण 21 व्या शतकामध्ये यशस्वी वाटचाल करत आहोत. 21 वे शतक हे निश्चित आपल्या भारतमातेचे आहे. आणि आपले विद्यार्थी आपल्या भारत मातेचे भविष्य आहेत. उदयाचा नवनवीन भारत घडविणे आपल्या तरुण विद्यार्थ्यांच्या हातीआहे. अशा आपल्या सर्व विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करुन व हि नवीन पिढी या नवीन तंत्रज्ञानाकडे करिअर करण्यासाठी सहा वर्षाचा इंटिग्रेटेड अभ्यासक्र अतिशय चांगला आहे.

या सहा वर्षाच्या अभ्यासक्रामास विद्यार्थ्यी 10 वी नंतर त्याच्या आवडीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतो व अभियांत्रिकीचे सर्व ज्ञान वा कौशल्य आत्मसात करु शकतो. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रथम वर्षापासून बेसिक सायन्स, फंडामेंटल इंजिनीअरिंग सब्जेक्ट, कोअर इंजिनीअरिंग सब्जेक्ट, अ‍ॅडव्हान्स इंजिनीअरिंग सब्जेक्ट, प्रोजेक्ट, एक वर्षाची इंडस्ट्री इंटर्नशिप दिली जाते.

यासर्व बाबींचा विचार करुन पुण्यातील अत्यंत नावाजलेले डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राहुल कराड सर यांनी उद्याचा नवीन युवक घडविण्यासाठी आपल्या विद्यापीठामध्ये दहावीनंतर सहा वर्षाचा इंटिगे्रटेड अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु केलेला आहे. विद्यापीठामध्ये विद्यार्थी या कोर्सेससाठी शैक्षणिक वर्ष 21-22 मध्ये प्रवेश घेऊ शकतो.

विद्यार्थ्यांमध्ये नव चैतन्य निमार्ण होण्यासाठी प्रथम वर्षापासूनच विद्यार्थ्यांमध्ये हॅन्ड ऑन स्किल, स्किल बेस्ड प्रॅक्टिकल्स, इनोव्हेशन, सेंटर ऑफ एक्सलंस, रिसर्च तसेच इंडस्ट्री रिलेटेड अभ्यासक्र. या माध्यमातून नवीन अभियांत्रिक विद्यार्थी घडविण्याचे काम अतिशय कटिबद्धपणे या विद्यापीठात चालू आहे. दहावीनंतर विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकीची आवड निर्माण होऊन त्याचे तांत्रिक कौशल्य व शोधक वृत्ती तयार होते.

हेही वाचा: राजगुरुनगर व्यापारी महासंघाची पूरग्रस्तांना मदत

इंस्टीटयुट-इंडस्ट्री इंटरअ‍ॅक्शन हा स्वतंत्र विभाग असून विद्यार्थ्यांना त्यांनी मिळविलेल्या अभियांत्रिकी शिक्षणाचा, औद्योगिक क्षेत्रामध्ये वापर करण्याचा अनुभव प्राप्त होतो. जेणेकरुन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात व शिवाय या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये सामंजस्य करार करण्यात आले आहेत. सध्या दहावीनंतरचा हा नवीन अभ्यासक्रम कोणत्याही शासकीय विद्यापीठामध्ये उपलब्ध नाही, परंतु देशातील काही खाजगी विद्यापीठामध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

मित्रहो, शेवटी एकच सांगेन ज्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर अभियांत्रिकी शाखेमध्ये आपले करिअर करायचे असेल तर हि अतिशय उत्तम संधी आहे. यात विद्यार्थ्यांचा वैयक्तीक व व्यवसायीक विकास उत्तम प्रकारे होतो. विचार करा आणि या नविन तंत्रज्ञानाशी आपले नाते जोडा. आपल्या प्रवेशासाठी एमआयटी-डब्ल्यूपीयू सध्या ह्या कार्यक्रमासाठी अर्ज स्वीकारत आहे. अर्ज करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: bit.ly/3tsgYui

प्रा.डॉ. सुनिल श्री. कराड

सहयोगी प्राध्यापक

एमआयटी विश्वशांती विद्यापीठ,

पुणे, भारत.

loading image
go to top