अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी (व्हिडिओ)

bhama askhed
bhama askhed

आंबेठाण (पुणे) : खेड तालुक्यातील भामा आसखडे धरणावरून टाकण्यात येणाऱ्या पुणे जलवाहिनीचे काम जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असा इशारा देत भामा आसखेड प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी  दिला. तसेच, पोलिस प्रशासन आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारची ही हिटलरशाही सुरू असून, आम्ही मात्र लोकशाही मार्गाने लढा देत आहे. आमच्या मागण्या पूर्ण करा नाही, तर आम्हाला अटक करा, अशी मागणी करत आसखेड खुर्द (ता. खेड) येथे सुरू असणारे जलवाहिनीचे काम बंद पाडले. या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

जलवाहिनीचे काम सुरू असणाऱ्या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून जवळपास आठशे ते एक हजार प्रकल्पग्रस्त जमा होऊ लागले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी विविध ठिकाणी नाकेबंदी करीत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यात काही शेतकरी जखमी झाले. तर, काही शेतकऱ्यांना पोलिस घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात गाडीतून पडल्याने गबाजी दगडू सातपुते (रा. शिवे) हा शेतकरी जखमी झाला. तर, धामणे फाटा येथे जमलेल्या शेतकऱ्यांपैकी मारुती बांदल या शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांचा प्रचंड विरोध असताना देखील वाट मिळेल त्या मार्गाने शेतकरी जलवाहिनी काम सुरू असणाऱ्या ठिकाणी जमा झाले. त्यात महिलांचे प्रमाण मोठे होते. धामणे फाटा येथे जमलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अन्य शेतकऱ्यांनी गाडीला आडवे होत त्यांना दुसरीकडे नेण्यापासून रोखले. पोलिसांचा प्रचंड विरोध असताना देखील शेतकरी मिळेल त्या मार्गाने कामाच्या ठिकाणी पोहचले आणि काम बंद पाडले. या वेळी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com