कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी भारत फोर्जची भन्नाट यंत्रणा

Bharat Forge abandonment system to monitor employee health
Bharat Forge abandonment system to monitor employee health

पुणे, ता. 8 : कोरोनासोबत दिर्घकाळ टिकाव धरण्यासाठी उद्योग, व्यवसाय आणि सरकारी आस्थापनांना रोज कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी सध्या सुरक्षा कर्मचारीच तापमानाची नोंद आणि सॅनिटायझर देत आहे. परंतू, कर्मचाऱ्यांच्या रोजच्या आरोग्य तपशिलाची नोंद ठेवणे, संपर्कविहीन पद्धतीने मोजमाप आणि विश्‍लेषण करणे शक्‍य होत नाही. त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत स्वयंचलीत पद्धतीने आरोग्याची तपासणी करणारी "हेल्थ रिस्क मॉनिटरिंग सिस्टीम' (एचआरएमएस) विकसीत करण्यात आली आहे. 

कोरोनावर आणखी एक औषध लवकरच; प्रसिद्ध फार्मा कंपनीने केली घोषणा
"ब्लॅकस्ट्रॉ' या स्टार्टअप कंपनीच्या सहकार्याने भारत फोर्जने (बीएफएल)"एचआरएमएस' हा पर्याय सादर केला आहे. व्हिडिओच्या माध्यमातून विश्‍लेषण करणारी बुद्धिमान स्वरुपाची यंत्रणा आहे. तंत्रज्ञान व एआय यांच्यावर भविष्यात अवलंबून राहू शकणाऱ्या कंपन्यांमधील कामगारांनी केंद्रिय गृह खात्याच्या नियमांचे पालन करावे, अशी तजवीज या यंत्रणेमध्ये करण्यात आली आहे 

एचआरएमएस वैशिष्ट्ये ः 

अ) कॅमेऱ्यांमधून तपमानाची मोजणी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी युक्त ओळखपत्र (आरएफआयडी) या सर्व तंत्रज्ञानांनी युक्त अशी ही यंत्रणा आहे. कंपनीच्या आवारातून ये-जा करणाऱ्या सर्व व्यक्तींचे शारिरीक तापमान मोजून त्यांची स्वयंचलित पद्धतीने दैनंदिन नोंद या यंत्रणेत ठेवली जाते. 

हातात नाही छदाम.. उभा ठाकला खरीप हंगाम...
ब) एआय अल्गोरिदमच्या तंत्रज्ञानावर आधारीत सीसीटिव्ही कॅमेरांच्या माध्यमातून कंपनीच्या आवारातील व्यक्तींच्या हालचालींची नोंद करणे व देखरेख ठेवणे. कंपनीच्या आवारातील कर्मचारी शारीरिक अंतर राखण्याच्या किंवा फेस मास्क लावण्याच्या नियमांचे उल्लंघन करीत असतील, तर त्यांची नोंद घेऊन त्यासंबंधीची सूचना प्रशासकांना देणे आणि फलकांवर झळकवणे. 

उद्योगांसाठी चिंतामुक्त आणि वाढीस चालना देणारे वातावरण तयार करुन, लोकांच्या आरोग्यासाठी सुरक्षितता निर्माण करण्याकरीता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान यांचा उपयोग केला आहे. सुरक्षिततेच्या निकषांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही मानवी हस्तक्षेप होणार नाही, अशा स्वरुपाची "एचआरएमएस'यंत्रणा विकसित केली आहे, असं  भारत फोर्ज लि.चे अध्यक्ष बाबा कल्याणी म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com