इंदापूर : भरत शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजप पॅनेलला ऊर्जा

दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांचे खंदे सहकारी गोकुळदास शहा यांनी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही आमची संस्था आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली होती.
इंदापूर : भरत शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजप पॅनेलला ऊर्जा

इंदापूर - कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या पुढाकाराने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कर्मयोगी कारखान्याचे संस्थापक उपाध्यक्ष गोकूळदास शहा यांच्यातील मतभेद मिटले. त्यानंतर शहा यांचे पुतणे, कारखानासंचालक तथा इंदापूर बँकेचे माजी अध्यक्ष भरत शहा यांनी कारखाना निवडणूकीसाठी ऊस उत्पादक गटातून उमेदवारी अर्ज तहसीलदार श्रीकांत पाटील, सहाय्यक निबंधक जिजाबा गावडे यांच्याकडे दाखल केला. त्यामुळे श्री.पाटील यांच्या पॅनेलचा विजय आणखी सोपा झाला आहे.

दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांचे खंदे सहकारी गोकुळदास शहा यांनी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ ही आमची संस्था आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर गोकुळदास शहा हे दिवंगत खासदार शंकरराव पाटील यांच्या स्थानी असून मी त्यांच्या शब्दाबाहेर नाही. श्री. शहा, त्यांचे चिरंजीव तथा इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, सुनबाई तथा नगराध्यक्षा अंकिता शहा, पुतणे तथा इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष भरत शहा यांचे योगदान मोठे आहे. संस्थेत त्यांचा योग्य मानसन्मान राखला जाईल. तसेच, त्यांच्या अधिकारावर कुठलेही गंडांतर येणार नाही. अशी ग्वाही श्री. पाटील यांनी दिल्यानंतर त्यांच्यातील दुरावा संपला.

इंदापूर : भरत शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजप पॅनेलला ऊर्जा
ओशोंच्या आश्रमात घोटाळा? अनुयायांनी घेतली रामदास आठवलेंची भेट

त्यानंतर मुकुंद शहा व भरत शहा या बंधूनी दूध संघात श्री. पाटील यांची भेट घेवुन चर्चा केल्याने त्यांचे मनोमिलन झाले. भरत शहा यांनी एप्रिल महिन्यामध्ये इतरांना संधी हे कारण पुढे करून विविध पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. श्री. पाटील यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया न दिल्याने यामध्ये राजकारण दडल्याची चर्चा होती. नंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी श्री शहा कुटुंबीयांची त्यांच्या घरी भेट घेवून त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. परंतु दिवंगत खासदार शंकरराव पाटील, त्यांच्या कन्या पद्माताई भोसले, हर्षवर्धन पाटील यांच्याशी शहा कुटुंब निष्ठावंत राहिले.

यावेळी ॲड.शरद जामदार,ॲड.कृष्णाजी यादव, माऊली चवरे, देवराज जाधव, रघुनाथ राऊत,शकील सय्यद, महेंद्र रेडके, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, दत्ता पांढरे, अरशाद सय्यद,अंगद शहा, राहुल जवंजाळ उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com