एनआयआरएफ रँकिंगमध्ये भारती विद्यापीठ आयएमईडीला 63वे मानांकन

Bharti University IS ranked 63rd in the NIRF ranking.jpg
Bharti University IS ranked 63rd in the NIRF ranking.jpg

पुणे : भारती अभिमत विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ला (आयएमईडी) ‘नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क' (एनआयआरएफ) सर्वेक्षणात देशात 63व्या क्रमांकाच्या महाविद्यालयाचे मानांकन मिळाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

भारती विद्यापीठालाही सर्वेक्षणाच्या विद्यापीठ क्रमवारीत 63 वे मानांकन मिळाले आहे. भारती विद्यापीठाच्या 3 फ़ार्मसी इन्स्टिट्यूट, 1 अभियांत्रिकी महाविद्यालय आणि 1 व्यवस्थापनशास्त्र महाविद्यालय पहिल्या 100 क्रमवारीत आहे.

संस्थापक स्व.डॉ.पतंगराव कदम, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, सचिव डॉ.विश्‍वजीत कदम यांच्या पाठिंब्यामुळे व त्यांच्या प्रोत्साहनामुळे भारती विद्यापीठाने हे यश मिळविले आहे. उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उत्तम शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच आयएमईडी ला व्यवस्थापनाच्या शिक्षणक्षेत्रात मोठे योगदान देणे शक्य झाले आहे. अशी प्रतिक्रिया डॉ. सचिन वेर्णेकर यांनी व्यक्त केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com