esakal | भाटघर धरण ओव्हरफ्लो; धरणाचे १७ दरवाजे उघडले 
sakal

बोलून बातमी शोधा

Bhatghar dam overflow and 17 gates of the dam

बुधवारी रात्री १२ वाजता धरणात १०० टक्के म्हणजे २३.७४ टीएमसी पाणीसाठा झाला आणि धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. एकामागून एक १५ स्वयंचलीत दरवाजे उघडले गेले. गुरुवारी सकाळपासून आणखी दोन असे एकून १७ स्वयंचलीत दरवाजे उघडले गेले.

भाटघर धरण ओव्हरफ्लो; धरणाचे १७ दरवाजे उघडले 

sakal_logo
By
विजय जाधव

भोर(पुणे), ता. २०ः तालुक्यातील ब्रिटीशकालीन भाटघर धरण बुधवारी (ता.१९) रात्री १२ वाजता १०० टक्के भरून धरणाच्या स्वयंचलीत दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाला. गुरुवारी (ता.२०) सकाळी सहा वाजता धरणाच्या १७ स्वयंचलीत दरवाजांमधून ४ हजार २०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरु होता. मंगळवारी(ता.१८) सकाळी धरणात ९७ टक्के पाणीसाठा होता. त्यानंतर २४ तासात धरण भरण्याचा अंदाज होता. परंतु धरण क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे उर्वरित ३ टक्के धरण भरण्यासाठी सुमारे ४० तासांचा कालावधी लागला.

'पीएमपी'साठी महापौर मोहोळ घेणार पुढाकार; बससेवा लवकर सुरू होण्याची शक्यता!

बुधवारी रात्री १२ वाजता धरणात १०० टक्के म्हणजे २३.७४ टीएमसी पाणीसाठा झाला आणि धरणाचे स्वयंचलीत दरवाजे उघडण्यास सुरुवात झाली. एकामागून एक १५ स्वयंचलीत दरवाजे उघडले गेले. गुरुवारी सकाळपासून आणखी दोन असे एकून १७ स्वयंचलीत दरवाजे उघडले गेले. दरम्यान, दोन दिवसांपासून जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, शाखा अभियंता अनिल नलावडे, नाना कांबळे, अमोल कापरे आदींसह तांत्रीक साहाय्यक धरणावर लक्ष ठेवून होते. बुधवारी सायंकाळी राजेंद्र धोडपकर यांच्या हस्ते धरणातील पाण्याचे पूजनही करण्यात आले. यावेळी भोर नगरपालिकेचे माजी नगरसेवक जगदीश किरवे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धारणे उपस्थित होते. 

पुणेकरांच्या विरोधापुढे महापालिका झुकली; 'ते' बहुचर्चित टेंडर केलं रद्द!​

पुणे, सातारा व सोलापूर या तीन जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र हे भाटघर धरणाच्या पाण्यातून ओलिताखाली येत आहे. धरणास ४५ स्वयंचलीत आणि ३६ रोलिंग (मॅन्युअल) दरवाजे असे एकून ८१ दरवाजे आहेत. यावर्षी तालुक्यात पावसाला उशीरा सुरुवात झाल्याने धरण भरण्यास १६ दिवसांचा जास्त कालावधी लागला. गतवर्षी धरण ४ ऑगष्टला भरले होते. तर २०१८ साली धरण १३ ऑगष्टला भरले होते. तालुक्यातील दुसरे ११.९३ टीएमसी क्षमता असलेले नीरा देवघर धरण हे ९१.११ टक्के भरले आहे. पुढील दोन-चार दिवसात नीरा-देवघर धरणही १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. वेल्हे तालुक्यातील गुंजवणी धरणही १०० टक्के भरले असून धरणातून २०० क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. भाटघर, गुंजवणी व नीरा-देवघर धरणातील पाणी हे वीर धरणात जात असल्यामुळे वीर धरणाच्या कालव्यातून आणि सांडव्यातून गुरुवारी सकाळपासून ९ हजार ७७४ क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image
go to top