esakal | पुणे: कोंढवे कोपरे ते बहुली रस्त्याच्या रुंदीकरणाचे १० नंबर येथे भूमिपूजन
sakal

बोलून बातमी शोधा

कोंढवे ते बहुली रस्त्याच्या रुंदीकरणाचे १० नंबर येथे भूमिपूजन

कोंढवे ते बहुली रस्त्याच्या रुंदीकरणाचे १० नंबर येथे भूमिपूजन

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला: वारजे-बहुली रस्त्यावरील १० नंबर येथे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. राज्य सरकारच्या अंदाजपत्रकात यासाठी २.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यासाठी खासदार सुळे यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.

हेही वाचा: इंदापूरच्या पश्‍चिम भागामध्ये लाळ्या खुरकूत रोगाचे थैमान

हा रस्ता राज्यमार्ग ११५ पाषाण- सुसू- बहुली- कुडजे- उत्तमनगर- शिवणे मार्गे वारजे असा आहे. त्यातील ५२ ते ५४ (खडकवासला फाट्यापासून कुडजे बाजूला) दोन किलोमीटर अंतरावर रुंदीकरण व डांबरीकरणासाठी निधी मिळाला आहे. हा रस्ता सध्या साडेपाच मीटर आहे. रस्त्याचे एका बाजूला पाऊण मीटर रुंदीकरण असे दोन्ही बाजूला मिळून दीड मीटर रुंदीकरण होणार आहे. त्यांनतर हा रस्ता सात मीटरचा होईल. त्या संपूर्ण सात मीटरचा रस्ता डांबरीकरण करण्यात येईल.

या कामात रुंदीकरण करताना खोदाई, मुरुमीकरण, खडीकरण होणार आहे. सात मीटरवर डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेंच रस्त्याला साईडपट्टी असणार आहे. या दोन किलोमीटरच्या कामासाठी अडीच कोटी रुपयांमध्ये काम होणार आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत चौगुले, शाखा अभियंता सूर्यकांत कुंभार यांनी ही माहिती उपस्थितांना दिली.

जिल्हा परिषदेच्या सदस्या अनिता इंगळे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, नगरसेवक सचिन दोडके, नगरसेविका सायली वांजळे, काशीनाथ मोरे, काका चव्हाण, त्रिंबक मोकाशी, सुरेश गुजर, उपसरपंच समीर पायगुडे, युवराज मोरे, आनंद मते, माणिक मोकाशी, अतुल धावडे, रवींद्र पायगुडे, विजय गायकवाड, प्रवीण शिंदे गणेश दांगट, अशोक मोरे विजय मोरे उपस्थित होते.

loading image
go to top