Pune_Market_Yard
Pune_Market_Yard

Lockdown : पोलिसांच्या सहकार्यानंतर अखेर भुसार बाजार सुरू!

Published on

मार्केट यार्ड : पोलिसांनी सहकार्य करण्याची भूमिका घेतली असल्याने बुधवारपासून (ता.१५) मार्केट यार्डातील भुसार बाजार नियमित सुरू झाला आहे. त्यामुळे शहर, उपनगरातील किराणा माल आणि धान्याचा तुटववडा दूर होणार आहे. बाजार सुरू झाल्याने शहरातील नागरिकांना लॉकडाऊनच्या काळात काहीसा दिलासा मिळाला आहे. 

बुधवारी भुसार बाजारात 110 गाड्यांची आवक झाली. यामधून साधारणतः पंधरा हजार क्विंटल मालाची अवाक झाली असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. तीन दिवसानंतर मार्केट सुरू झाल्याने खरेदीसाठी बाजारात गर्दी होती. दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले, किराणा भुसार मालाचे दर स्थिर आहेत. बाजारात माल मुबलक आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेते आणि घरगुती ग्राहकांनी मालाची साठवणूक करण्याची गरज नाही.

भुसार बाजार बंद ठेवल्याने शहरात किराणा मालाचा आणि धान्याचा तुटवडा जाणवेल. तसेच लोकांची गैरसोय होईल. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी भुसार बाजार सुरू करा. त्यासाठी प्रशासन मदत करेल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार पोलिसांनी बाजार समितीच्या पासवर व्यापारी, हमाल, तोलणार आणि माल घेवून येणारी वाहने सोडण्याचा निर्णय पोलिसांनी जाहीर केला. त्यामुळे भुसार बाजार सुरू झाला आहे. बाजार सुरू ठेवण्याबाबत पोलिस प्रशासन सहकार्य करीत आहे. सध्या भुसार बाजाराचे कामकाज सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत सुरू राहणार असल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.

मोशीतील बाजार सुरू

मोशी येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजाराचे कामकाज बुधवारी रात्रीपासून सुरू करण्यात आले आहे. रात्री नऊ ते बारा वाजेपर्यंत शेतीमालाची आवक उपबाजरात होणार आहे. त्यानंतर शेतीमालाच्या गाड्यांना मोशीतील उपबाजारात प्रवेश दिला जाणार नाही. आवक झालेल्या शेतीमालाची विक्री पहाटे दोन ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

उपबाजारात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार नाही. अडत्यांनी घाऊक खरेदीदारांना भाजीपाल्याची विक्री करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बाजार आवारातील सर्व व्यवहार सोशल डिस्टन्सिंग ठेवून करण्यात याव्यात, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती प्रशासक बी जे. देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com