
मार्केट यार्ड : गेल्या काही दिवसांपासून बंद असलेला भुसार बाजार सुरू करण्याबाबत पोलीस उपआयुक्त, बाजार समितीचे प्रशासक आणि दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यात सोमवारी (ता.१३) बैठक पार पडली.
या बैठकीनंतर दि पूना चेंबरच्या कार्यकारणीची बैठक पार पडली. त्यामध्ये सर्वानुमते बुधवार (ता.१५) पासून मार्केट यार्डातील गूळ भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी दिली. या निर्णयामुळे शहरात आता किराणा मालाचा तुटवडा निर्माण होणार नाही.
धान्य माल वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालक तसेच दुकानातील कामगार यांना पोलिस प्रशासनाकडून कोणताही त्रास होणार नाही. तसेच बाजार समितीने दिलेले ओळखपत्र दाखविल्यानंतरच कामगारांना सोडण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपआयुक्तांनी चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे चेंबरच्या कार्यकारणीच्या बैठकीत बाजार चालू करण्याची चर्चा झाली.
येत्या बुधवार (ता.१५) पासून गूळ भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बैठकीला पोलीस उपआयुक्त बच्चन सिंग, सह निबंधक डॉ. अशोक कुंभार, बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, सचिव विजय मुथा, राजेंद्र बाठीया यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.