बिग बी आणि अजय देवगण बारामतीत येतात तेव्हा...

big b amitabh bachchan ajay devgan
big b amitabh bachchan ajay devgan

बारामती - महानायक बिग बी अमिताभ बच्चन आणि सिंघम अजय देवगण शुक्रवारी सकाळी  बारामतीमध्ये आले होते. बारामती एअरपोर्टवर अचानक हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन नायक उतरल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला.  अमिताभ बच्चन व अजय देवगण एकत्र पाहिल्यावर अनेकांना विश्वासही बसत नव्हता.

बारामती विमानतळावर एका चित्रपटातील प्रसंगाचं चित्रिकरण होणार होतं. यासाठी दोघेही बारामती विमानतळावर आले होते. दोघेही इथं येणार असल्याची कल्पना काही मोजक्या लोकांनाच होती. शुक्रवारी सकाळी खासगी विमानाने बिग बी आणि अजय देवगण बारामती विमानतळावर उतरले.

चित्रपटातील शूटिंगमध्ये ते एका हेलिकॉप्टरमध्ये बसून ते विमानतळावर उतरतात आणि उतरल्यानंतर अभिवादन करतात असा तो प्रसंग होता. शूटिंग करण्यात आलेला प्रसंग कोणत्या चित्रपटातला होता हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. शूट आटोपल्यानतंर दोघेही पुन्हा मुंबईला परतले. अमिताभ बच्चन व अजय देवगण यांचे स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, बारामती सहकारी औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष रणजित पवार, शुभांगी पवार आदींनी केले. त्यांनी काही वेळ या दोघांशी संवादही साधला. 

हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचे दोन कलाकार बारामतीत विमानतळावर शुटींगसाठी येणार आहेत याची कल्पना कोणालाच नव्हती. जे काही मोजके लोक त्या वेळेस विमानतळावर उपस्थित होते त्यांनाच बिग बीं समवेत छायाचित्र काढण्याची संधी मिळाली. अनेकांना ही बातमी समजल्यावर लोकांनी विमानतळाकडे धाव घेतली मात्र तो पर्यंत शुटींग आटोपून हे दोन्ही तारे मुंबईकडे विमानाने रवाना झाले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com