'अन् ते मोदी सरकार पैसे देणार होेतं; पण पैसे मिळणार कधी?' 

modi.jpg
modi.jpg

पुणे : गेल्या दोन महिन्यांपासून धंदा बंद राहिला... जी शिल्लक होती, ती ही लॉकडाऊनच्या काळात संपली... व्यवसाय सुरू करावयाचा, तर पैसा कुठून आणायचा.. अन् ते मोदी सरकार व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा हजार रुपये देणार आहे, असे कळले होते. पण पुढे काय झाले माहिती नाही... ही व्यथा आहे वडपावची गाडी लावणाऱ्या सावित्रीबाईंची.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सावित्रीबाई हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशीच अवस्था शहरातील बहुतांश पथारी व्यावसायिकांची आहे. श्रीमंतामधून आलेल्या या महामारीने तर आमचे जीवन उद्‌ध्वस्त केले आहे. कष्ट करून जी काही थोडी पुंजी जमा झाली होती. ती या लॉकडाउनच्या काळात खर्च झाली, अशी भावना अनेक पथारी- हातगाडी व्यावसायिकांनी बोलून दाखविली. उलट डोक्‍यावर नव्याने कर्ज झाले आहे. अजून किती दिवस वाट पाहणार.. घरी राहिलो, तर उपाशी मरणार आणि बाहेर पडलो तर ही महामारी अशा कात्रीत आम्ही सापडलो असल्याची भावना पथारी व्यावसायिकांनी बोलून दाखविली. 

लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शहरातील पथारी व्यावसायिकांना बसला. हातावर पोट असणाऱ्या या व्यवसायातील अनेकांची कुटुंब उद्‌ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी मोदी सरकारने पथारी-हातगाडी व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी दहा हजार रुपयांची भांडवल देणार असल्याची घोषणा केली होती. त्यास दहा दिवस होऊन गेले, अद्याप ही मदत मिळालेली नाही. ती कधी आणि कशी मिळणार यांची माहिती देखील पथारी व्यवसायिकांपर्यंत गेलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारची ही घोषणा सध्या तरी कागदावरच राहिली आहे.

तसेच सरकार देईल तेव्हा देईल, परंतु पुन्हा व्यवसाय सुरू करून कुटुंबाची गाडी रूळावर आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी व्याजाने पैसे घ्यावे लागले, तरी चालतील, अशा मनस्थितीपर्यंत काही पथारी व्यावसायिक आले आहेत. त्यामुळे मायबाप सरकार आता तरी लक्ष देईल .. अशी भाबडी आशा त्यांना लागून राहिली आहे. 

पुणे शहरात नोंदणीकृत पथारी व्यावसायिकांची संख्या 
-18 हजार 225 
शहरातील एकूण पथारी व्यावसायिकांची संख्या 
- 48 हजार 

केंद्र सरकारने दहा हजाराची योजना आणली आहे. ती तत्काळ फेरीवाल्यांच्या खात्यावर जमा करावी. ती जर खात्यावर जमा होणार नसेल, तर राज्य सरकार आणि महापालिकेने ही जबाबदारी स्वीकारून फेरीवाल्यांना पैसे उपलब्ध करून द्यावेत. 
-संजय शंके ( कार्यवाह, जाणीव हातगाडी, पथारी, फेरीवाले संघटना) 

मोदींचे आश्‍वासन आहे. मागे पंधरा लाख रुपये जमा करणार होते. अजून जमा झाले नाही. आता दहा हजार तरी जमा करणार आहे की नाही. घोषणा तर केली आहे. मिळाले तर खरे. त्यामुळे महापालिकेने आणि राज्य सरकारने तरी पुढाकार घेऊन ही रक्कम तत्काळ उपलब्ध करून द्यावी. 
-बाळासाहेब मोरे ( सरचिटणीस, पथारी पंचायत, महाराष्ट्र ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com