esakal | दुचाकी चोरट्याला अटक; सात दुचाकी जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

भारती विद्यापीठ पोलिस

दुचाकी चोरट्याला अटक; सात दुचाकी जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरून त्यांची विक्री करणा-या चोरट्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याकडून सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: पाच रुपयांत मनपा पीएमपीएलची बस सेवा

गणेश बाळू ओतारी (वय २३, रा. शिवाजीनगर, खंडाळा, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कात्रज भागातील व्यावसायिक अजय धरपाळे यांची दुचाकी २३ आॅगस्टच्या रात्री कात्रजमधील अंजलीनगर भागातून चोरीला गेली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत होता. दरम्यान कात्रजमधील एका गॅरेजजवळ ओतारी यांची चोरलेली दुचाकी घेऊन थांबल्याची माहिती पोलिस कर्मचारी अभिजित जाधव यांना मिळाली. पोलिसांनी ओतारीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तेव्हा त्याने संबंधित दुचाकी कात्रजमधून चोरल्याची कबुली दिली.

हेही वाचा: किरीट सोमय्यांचा बारामती दौरा; जाणून घ्या त्यामागचं कारण

ओतारीकडे चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याने चतु:शृंगी, कोथरूड, सातारा जिल्ह्यातील फलटण, लोणंद परिसरातून दुचाकी लांबविल्याची माहिती चौकशीत दिली. त्याच्याकडून एकूण सात दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे शाखेतील निरीक्षक संगीता यादव, विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, गणेश सुतार, सचिन पवार आदींनी ही कारवाई केली.

loading image
go to top