झाडांचा असा वाढदिवस तुम्ही केव्हा पाहिला आहे का...

डॉ. संदेश शहा
Sunday, 16 August 2020

नगरपरिषदेने अटल घनवन योजनेअंतर्गत एक वर्षांपूर्वी लावलेल्या २२०० झाडांचा वाढदिवस नगराध्यक्षा अंकिता शहा व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते करण्यात आला.

इंदापूर : नगरपरिषदेने अटल घनवन योजनेअंतर्गत एक वर्षांपूर्वी लावलेल्या २२०० झाडांचा वाढदिवस नगराध्यक्षा अंकिता शहा व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा : सुशांतची एक्स गर्लफ्रेंडवर गंभीर आरोप, अंकितानं दिलं 'असं' सडेतोड प्रतिउत्तर

नगरपरिषदेने सामाजिक, स्वयंसेवी संस्था, शाळा, इंदापूर महाविद्यालय विद्यार्थी, नागरिक यांच्या सहकार्याने दि. 15 ऑगस्ट 2019 रोजी भार्गवराम बगीच्या शेजारील टाऊन हॉलच्या पाठीमागे वीस गुंठे क्षेत्रामध्ये 2200 वृक्ष लागवड करून आनंद अटल घन विकसित केले होते.

झाडांची वाढ चांगली झाल्यामुळे शहरात ऑक्सिजन पार्क तयार झाला. या ऑक्सिजन पार्कमध्ये नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी झाडांचे पूजन करून झाडे जोपासण्याची शपथ घेतली. त्यानंतर केक कापून तसेच पेढे वाटून झाडांचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.

नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल सर्व नगरसेवक, कर्मचारी यांच्या संकल्पनेतून हे ऑक्सिजन पार्क तयार झाले. पार्कमध्ये आंबा, चिंच, वड, काटेसावर, बेहडा, अर्जुन सादडा, अंजीर, कांचन, उंबर, पेरू, सीताफळ, शेवगा, पपई, गोळ भेंडी, जांभुळ, इलायची, चिंच यासारख्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन कधी होणार सुरू? बड्या मंत्र्यानं दिलं 'हे' उत्तर

यावेळी विलास चव्हाण, रमेश शिंदे, अरूण शिंदे, अशोक चिंचकर, चंद्रकांत शिंदे, लिलाचंद पोळ आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा अंकिता शहा म्हणाल्या, ''आपण एक वर्षापूर्वी लावलेल्या रोपाचे रूपांतर आज वटवृक्षामध्ये झाल्याने आनंद व्दिगुणीत झाला आहे. त्यामुळे हरित इंदापूर होत असून ऑक्सिजन पार्क तयार झाले आहे. या प्रकारचे ऑक्सिजन पार्क शहरात सर्व बाजूने तयार व्हावेत.'' सूत्रसंचालन अल्ताफ पठाण तर आभार गजानन पुंडे यांनी मानले.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Birthday celebration of trees in Indapur