

BJP’s Assertive Claim: Eyeing the Pune Legislative Council Seat
Sakal
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना पुण्याच्या जागेवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील तणाव वाढत आहे. जिल्ह्यात भाजप आणि आघाड्यांचे मिळून ३३३ मतांची ताकद आहे. त्यामुळे 'पुण्याची जागा भाजपलाच मिळाली पाहिजे,' असा आग्रह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाले आहे.