esakal | आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसरा राजीनामा; चंद्रकांत पाटील यांचा दावा
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant_Patil

राज्यात सगळ्या जागा लढविणार असून २०२४मध्ये महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणून दाखवू, असा दावा पाटील यांनी केला आहे. 

आठ दिवसांत ठाकरे सरकारमधील तिसरा राजीनामा; चंद्रकांत पाटील यांचा दावा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''राज्यात मोठा भूकंप होणार असून येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार आहे. राजीनाम्याची यादी तयार आहे. हळूहळू गोष्टी बाहेर येतील. ३६ बॉलमध्ये २ विकेट घेतल्या आहेत,'' असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त ते पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीवर टीका केली. 

पाटील पुढे म्हणाले की, तिसरा राजीनामा घेण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही. १५ वर्ष महिलेबरोबर संबंध, मारहाण आणि असे वेगवेगळे कारनामे त्यांचे आहेत. त्यांच्या कर्माने ते मरणार आहेत. अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयचे पथक पोहचले असून चौकशीला सुरवात झाली आहे. सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. आमचा लॉकडाउनला विरोध नाही, पण सर्वसामान्य जनतेसाठी राज्य सरकारने पॅकेज जाहीर केलं पाहिजे. मातोश्रीत बसून लॉकडाउन करणं सोप्प आहे, असा निशाणा त्यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला आहे. 

जया बच्चन भरणार ‘तृणमूल’च्या प्रचारात रंग; ममतादीदींसाठी घेणार सभा​

वर्धापनदिनानिमित्त पाटील म्हणाले, मुंबईत वर्धापनदिन साजरा करायचा होता, चलो मुंबई म्हणून उपक्रमाचे नियोजन केले होते. पण कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला. राष्ट्रीय स्तरावर हा कार्यक्रम व्हर्चुअल स्वरुपात करण्यात येणार आहे. थोड्या वेळात राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. या वर्धापनदिनी कोरोनाच्या काळात जनतेसोबत राहणार असून त्यांना दु:खातून बाहेर काढण्याचा निश्चय केला आहे. ऑक्सिजन बेड आणि रक्ताचा साठा वाढविणार आहे. राज्यात संघटना वाढविणे आणि वैचारिक पातळी वाढविण्यावर भर असेल. राज्यात सगळ्या जागा लढविणार असून २०२४मध्ये महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणून दाखवू, असा दावा पाटील यांनी केला आहे. 

२०३६पर्यंत पुतीन सत्तेत राहणार; संविधानात केला फेरबदल​

कोरेगाव भीमा, दिल्लीतील आंदोलन अशा ठिकाणी वैचारिक संघर्ष सुरू आहे. यामध्ये स्लीपर सेलचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. वैचारिक वाद काय आहे, डाव्यांचं म्हणणं काय आहे, विरोधकांचं म्हणणं काय आहे, याचा विचार करायला हवा, मुसलमान आमचा दुष्मन नाही, असंही पाटील यांनी म्हटलं आहे. 

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image