esakal | Breaking : पुण्यातील भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन
sakal

बोलून बातमी शोधा

Mahesh_Ladkat

नगरसेवक लडकत हे खासदार गिरीश बापट यांच्या खंदे समर्थकांपैकी एक होते.

Breaking : पुण्यातील भाजप नगरसेवक महेश लडकत यांचे निधन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक महेश लडकत (वय ५३) यांचे सोमवारी (ता.२८) रात्री दहाच्या सुमारास निधन झाले. त्यांच्यावर लिव्हर ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ती अयशस्वी झाल्याने त्यांचे निधन झाले. 

न्यूमोनियावर आली पहिली स्वदेशी लस; सिरमच्या 'न्यूमोसिल'चे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

११ ऑक्टोबर १९६७ रोजी लडकत यांचा जन्म झाला. नगरसेवक लडकत हे खासदार गिरीश बापट यांच्या खंदे समर्थकांपैकी एक होते. तसेच शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद, उद्यम सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्षपद ही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक कन्या, दोन भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

लडकत हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मंगळवारी सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी त्यांचे पार्थिव नवी पेठेतील कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

2021ला पृथ्वी होणार नष्ट; नॉस्ट्रेडॅमसची भविष्यवाणी ठरणार खरी?

महापालिकेच्या २०१७  च्या निवडणुकीत लडकत हे नव्या पेठेतून निवडून आले. त्यानंतर ते शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष झाले. तेव्हा, महापालिकेत समावेश झालेल्या येवलेवाडीचा विकास आराखडा (डीपी) त्यांनी मंजूर केला, त्याआधी  २००७ - २००८ मध्ये ते शिक्षण मंडळाचे सदस्य होते. त्याचकाळात लडकत यांच्याकडे समितीचे अध्यक्षपद आले. या काळात नवनव्या योजना राबवून लडकत यानी प्रथमच महापालिकेच्या शाळांत बदल केले. मागील आठवड्यात भाजपचे आणखी एक नगरसेवक विजय शेवाळे यांचेही निधन झाले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)