esakal | दारुड्यांच्या हल्ल्यात कोथरूडच्या माजी आमदार जखमी; वाचा काय घडले!
sakal

बोलून बातमी शोधा

Medha_Kulkarni

कोथरूड पोलिस ठाण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि नागरिकांसोबत बैठक आयोजित केली होती.​

दारुड्यांच्या हल्ल्यात कोथरूडच्या माजी आमदार जखमी; वाचा काय घडले!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोथरूड (पुणे) : कोथरूडमधील सहजानंद सोसायटीजवळ दारू पिण्यास बसलेल्या युवकांना जाब विचारला म्हणून चौघाजणांनी विलास कोल्हे आणि राहुल कोल्हे यांच्यावर हल्ला केला. 

- पुणे- नाशिक रेल्वेबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे काय म्हणाले पाहा!

बाहेर काहीतरी झाल्याचे समजताच तेथेच राहावयास असलेल्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि काय झाले म्हणून विचारणा केली. तेव्हा या गुंडांनी त्यांच्यावरही हल्ला केला. यामध्ये त्यांच्या हाताच्या बोटांना दुखापत झाली. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर 354 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

 - लाल महालात कसा साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा; वाचा सविस्तर!

माजी आमदार कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील नागरिकांना दारूड्यांचा मोठा त्रास होत आहे. पोलिसांत तक्रार दिल्यानंतरही दखल घेतली जात नाही. आजच्या घटने संदर्भात पोलिसांना कळवल्यानंतरही ते लवकर आले नाहीत. 

- '...अन्यथा सरकारला हस्तक्षेप करावा लागेल'; अजित पवारांनी कुणाला दिला इशारा?

दरम्यान कोथरूड पोलिस ठाण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापौर मुरलीधर मोहोळ आणि नागरिकांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये पोलिस व्यस्त होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image