esakal | 'रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा प्रकार'; चंद्रकांत पाटीलांची 'विनाशकाले विपरीत बुद्धी'
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant_Patil

देश आणि राज्यात गेली पन्नास वर्ष शरद पवार यांनी मोठे काम केले आहे. सर्वच बाबींची जाण असणारे नेते आहेत. देशाच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला आजही मान आहे. त्यामुळे पवार यांच्याबद्दल असे बोलणे पाटील यांना शोभणारे नाही.

'रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा प्रकार'; चंद्रकांत पाटीलांची 'विनाशकाले विपरीत बुद्धी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरील भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका म्हणजे विनाश काली विपरीत बुद्धी, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर "रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा हा प्रकार आहे,' अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. 

Big Breaking: महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत​

पदवीधर निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली होती. दरम्यान रविवारी (ता.२२) महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, अमोल कोल्हे पुण्यात आले होते. त्यावेळी पाटील यांच्या वक्तव्यांचा या सर्व नेत्यांनी कडक भाषेत समाचार घेतला. पवार यांनी तर भाषणात अनेकदा 'चंपा' असाच उल्लेख केला. 

पुणे : ताथवडे उद्यानात आढळला खापरखवल्या साप​

पवार म्हणाले, "ज्यांची योग्यता, पात्रता नाही; त्यांना कोणाबद्दल काय आणि कसे बोलावे, हे कळत नाही. ते कसेही बारळतात. देश आणि राज्यात गेली पन्नास वर्ष शरद पवार यांनी मोठे काम केले आहे. सर्वच बाबींची जाण असणारे नेते आहेत. देशाच्या राजकारणात त्यांच्या शब्दाला आजही मान आहे. त्यामुळे पवार यांच्याबद्दल असे बोलणे पाटील यांना शोभणारे नाही." 
तर कोल्हे म्हणाले," रस्त्यावरील दगडगोट्याने हिमालयाची स्पर्धा करण्यासारखा हा प्रकार आहे. त्यांच्या अशा टीकेने कसलाही फरक पडत नाही.'' तर दिलीप पाटील यांनी ही आपल्या भाषणातून पाटील यांचा समाचार घेतला.

ससूनच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यास विद्यार्थ्यांची धक्काबुक्की; अॅडमीट तरुणीला गेले होते भेटायला​

दिवाळीत आणि त्यानंतर पुण्यातील रस्त्यांवरील गर्दी पाहून "बाजीराव रस्यावरची लोकांची तुडुंब गर्दीत कोरोना चेंगरून मेला असेल,' असे सांगत पवार यांनी पुणेकरांच्या बेजबाबदारपणाबाबत चिंता व्यक्त केली. कोरोना संपला नाही, काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी पुणेकरांना केले. 

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यावर बोलण्याऐवजी "पकोडे तळा' असा सल्ला तरुणांना देणाऱ्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही निवडून देणार का, असा सवाल पवार यांनी पदवीधरच्या मतदारांना केला. 

पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले पाहिजे," असे सांगून पवार म्हणाले," गेल्या निवडणुकीत फेऱ्यावर फेऱ्या मोजून अधिकारी देखील वैतागले. अखेर वैतागलेल्या अधिकाऱ्यांनी "चंपा' विजयी झाल्याचे जाहीर केले. अशा प्रकारे तर हे निवडून आले.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)