Supriya Sule: सुप्रिया सुळेंना बारामतीत धक्का! प्रवीण माने सुनेत्रा पवारांना देणार पाठिंबा? आज स्पष्ट करणार भूमिका

Supriya Sule: प्रविण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख आहेत. भेटीनंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Supriya Sule
Supriya Suleesakal

Supriya Sule: लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांच्या गाठीभेटी, पक्षांतर, जागा वाटप, बैठका सुरू आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांना भाजपने मोठा धक्का दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांची भेट घेतली. प्रविण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख आहेत. भेटीनंतर ते महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

निवडणुका तोंडावर असतानाच सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसल्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने अजित पवार गटात जाणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर सोनाई ग्रुपचे संचालक दशरथ माने देखील अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा आहे. तर प्रवीण माने हे इंदापुरात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

सुप्रिया सुळे यांचे प्रचार प्रमुख असलेले जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने वेगळी भूमिका मांडणार का हे पाहणंही महत्त्वाचं आहे. अजित पवार यांच्या कडून शरद पवारांना हा मोठा धक्का असणार आहे. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माने यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली होती

Supriya Sule
Weather Update Maharashtra: उष्णतेपासून दिलासा! राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

प्रवीण माने आणि दशरथ माने हे सुनेत्रा पवारांना पाठिंबा देणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इंदापुर दौऱ्यावर आले होते, यावेळी त्यांनी प्रवीण माने, दशरथ माने यांची भेट घेतली होती. त्यानंतर हे दोघे अजित पवारांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. तर काही दिवसांपुर्वी हे दोघे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते. अशातच फडणवीसांच्या भेटीनंतर प्रवीण माने, दशरथ माने यांच्या भूमिकेत बदल होऊन ते सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे, त्यामुळे सुप्रिया सुळेंना हा मोठा धक्का असणार आहे.

Supriya Sule
Eknath Khadse News : ....तरीही मी शरद पवारांसोबतच!; रोहिणी खडसे यांनी स्पष्ट केली भूमिका

प्रविण मानेंच्या भेटीवर काय म्हणाले फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांची प्रविण माने यांच्या भेटीनंतर फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “प्रविण माने यांच्यांशी माझे खूप जुने संबंध आहेत. वैयक्तिक संबंध आहेत. ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की, इंदापुरात तुम्ही येता पण माझ्याकडे येत नाहीत. त्यामुळे मी कबूल केलं होती की, मी तुमच्याकडे चहा प्यायला येईल. त्यामुळे मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो. ते आमच्यासोबतच आहेत. आमचे जुने सहकारी आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Supriya Sule
Eknath Khadse : ''होय, मी माझ्या घरी जातोय...'', भाजपमध्ये निघालेले एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com