राज्य सरकार आंधळं, बहिरं अन् बधीर : हर्षवर्धन पाटील

डाॅ. संदेश शहा
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात आल्यानंतर त्यांनी पुणे शहर व जिल्ह्यासाठी काही दिले नाही. त्यामुळे हे सरकार आंधळं, बहिरं व बधीर असल्याची टीका भाजपचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

इंदापूर (पुणे) : महाविकासआघाडीचे राज्य सरकार शेतकऱ्यांची कर्ज माफी, शेतीमाल व दुधास हमीभाव देण्यास आणि कोरोना महामारी रोखण्यात अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यात आल्यानंतर त्यांनी पुणे शहर व जिल्ह्यासाठी काही दिले नाही. त्यामुळे हे सरकार आंधळं, बहिरं व बधीर असल्याची टीका भाजपचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधास प्रती लिटर 30 रुपये भाव द्यावा, गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये आणि दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी इंदापूर तालुका भाजप, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाई आठवले गटाच्या वतीने दूध दर वाढ आंदोलन करण्यात आले. हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर पोलिस ठाण्यापासून आंदोलन मोर्चास सुरुवात झाली. त्याचा समारोप इंदापूर तहसील कार्यालयासमोर करण्यात आला. आंदोलनात सहभागी गाईच्या अंगावरील राज्य सरकारचा जनावरांकडून निषेध हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या वेळी पोलिस, नागरिक, पत्रकार आणि कोविड सेंटरमध्ये आंदोलनकर्त्यांच्या वतीने मसाला दूध देण्यात आले.

गावागावांत तयार होणार तळीरामांची यादी

या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की, राज्याचे दुग्ध विकास राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे हे इंदापूरचे आहेत, मात्र त्यांनी दूध दरवाढी संदर्भात एक शब्द देखील बोलला नाही. त्यांना शेतकऱ्यांचा कळवळा नाही. या उलट दूधगंगाने अमूलशी करार केल्यानंतर संघ अवसायिनात काढण्याचा प्रयत्न राज्यमंत्र्यांनी केला. इंदापूर कोविड केंद्रात औषधे, स्वच्छता, व्हेंटिलेटर सुविधा नाही. आम्ही 40 वर्ष लाल दिवा बघितला असून, त्याचा वापर लोकहितासाठी केला असून, करत राहणार आहे. एमआयडीसी, शासकीय अधिकारी व स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडून जीवनावश्यक किट घेऊन वाटून त्याचे फोटो काढून स्वतःची प्रसिद्ध केली नाही. त्यामुळे स्वप्रसिद्धी करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळायचे काम राज्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यमंत्री हे काठावर पास झाले असून, ते मेरिटच्या गप्पा मारत आहेत. त्यांनी आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून, ही नीती सोडली पाहिजे. आम्ही केले तर राजकारण आणि तुम्ही केले तर ती सेवा, ही वृत्ती सोडली पाहिजे. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या वेळी दूधगंगाचे अध्यक्ष मंगेश पाटील, माजी सभापती विलास वाघमोडे, ऍड. कृष्णाजी यादव, आरपीआय आठवले गटाचे जिल्हा संघटक शिवाजी मखरे, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, सोशल मीडिया प्रमुख हर्षवर्धन कांबळे यांची भाषणे झाली. या वेळी लालासाहेब पवार, भरत शहा, रघुनाथ राऊत, महेंद्र रेडके, सुभाष काळे, कांतीलाल झगडे, अशोक इजगुडे, बाळासाहेब मोरे, माउली वाघमोडे, गणेश महाजन, दादासाहेब पिसे, संदीपान कडवळे, धनंजय पाटील, कैलास कदम, सागर गानबोटे आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Harshvardhan Patil criticizes the state government