esakal | गावागावात तयार होणार तळीरामांची यादी; पोलिस पाटलांना आदेश
sakal

बोलून बातमी शोधा

order to police patil to prepared the List of liquor consumers in villages

अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथे राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोव्हिड आढावा बैठकीत प्रसाद बोलत होते.ते म्हणाले, ''पत्ते व कॅरम खेळतानाही कोरोनाची लागण झाल्याच्या घटना पुणे जिल्यात घडल्या आहेत. त्या तुलनेत आंबेगाव तालुक्यात मंत्री दिलीप वळसे पाटील सतत आढावा बैठका घेऊन मार्गदर्शन करत असल्यामुळे येथे इतर तालुक्यांच्या तुलनेत कोरोना रोखण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. आंबेगाव तालुक्यात कोरोनामुळे पाच जणांच्या झालेल्या मृत्यूचे ऑडीट करा.

गावागावात तयार होणार तळीरामांची यादी; पोलिस पाटलांना आदेश

sakal_logo
By
डी.के.वळसे पाटील

मंचर : कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास दारूचे व्यसन असणाऱ्यांचे जीवन धोक्यात येते. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील प्रत्येक गावच्या पोलीस पाटील यांनी तळीरामांची यादी तयार करून जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी. पोलिस अधिकारी व पोलिसांनी तळीरामांची कानउघडणी करून त्यांना व्यसनमुक्त होण्याचा कार्यक्रम राबवावा. याकामी खेड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांनी पुढाकार घ्यावा." अशी सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकरी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केली.

पुण्यात या ठिकाणी रुग्णांना मिळतोय दिलासा

अवसरी फाटा (ता.आंबेगाव) येथे राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोव्हिड आढावा बैठकीत प्रसाद बोलत होते.ते म्हणाले, ''पत्ते व कॅरम खेळतानाही कोरोनाची लागण झाल्याच्या घटना पुणे जिल्यात घडल्या आहेत. त्या तुलनेत आंबेगाव तालुक्यात मंत्री दिलीप वळसे पाटील सतत आढावा बैठका घेऊन मार्गदर्शन करत असल्यामुळे येथे इतर तालुक्यांच्या तुलनेत कोरोना रोखण्यात बऱ्यापैकी यश आले आहे. आंबेगाव तालुक्यात कोरोनामुळे पाच जणांच्या झालेल्या मृत्यूचे ऑडीट करा.

''वळसे पाटील यांनी सूचित केल्याप्रमाणे एका कोरोना बाधितांच्या मागे किमान ३० जणांचा संपर्क गृहीत धरून त्यांचेही नमुने घ्या. त्यांना तंत्र निकेतन महाविद्यालयात होम क्वारटांइन करा. महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत अनेक रुग्णांना विविध प्रकारचे उपचार भीमाशंकर व गेटवेल हॉस्पिटलमध्ये मोफत मिळतात. याबाबत प्रशासनाने जनजागृती करावी.”

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा   

''आंबेगाव तालुक्यात अनेक गावात कामगार तलाठी, ग्रामसेवक फिरकत नाहीत.''अशी तक्रार ग्रामस्थांकडून केली जात असल्याचे आंबेगाव तालुक्याचे सभापती संजय गवारी यांनी  निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात आयुष प्रसाद म्हणाले,''दररोज तलाठी व ग्रामसेवकांनी गावात हजर राहणे बंधनकारक आहे. कोव्हिड कामात सार्वजनिक बांधकाम, कृषी, शिक्षण विभाग यांना सहभागी करून घ्यावे. या कामात कोणत्याही सरकारी कार्माचाऱ्याने असहकार दाखविल्यास त्यांची बदली भांडारा किवा गडचिरोली भागात होऊ शकते. मास्क न वापरणाऱ्यांवर सुरवातीला दंडात्मक कारवाई करावी दुसऱ्यांदा आढळून आल्यास त्याच्या विरोधात पोलिसांनी १८८ कलमानुसार कारवाई करावी. मंचर शहरात मास्क न वापरणाऱ्यांकडून तीन लाख रुपये दंड येत्या १५ दिवसात वसूल करावा. 

कोरोनाबाबत पुण्याच्या महापौरांनी दिली धक्कादायक माहिती 

''ज्यांच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण सापडले ते गावभर पुढारपण करत फिरतात. गेली ७० ते ७५ दिवस मंचरचा व्यापार बंद आहे. व्यापारी व लहान व्यावसाईक आर्थिक अडचणीत आहेत. तशीच परस्थिती घोडेगाव बाजारपेठेची आहे. सततच्या लॉकडाऊन बाबत प्रशासनाने फेरविचार करावा,''अशी मागणी शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी केली. या संदर्भात प्रशासनाने मंचर व घोडेगावचे व्यवहार सुरळीत होण्यासाठी कार्यवाही करावी.अशी सूचना वळसे पाटील यांनी केली. 

वीजग्राहकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता