आता भाजपचे लक्ष्य समान नागरी कायदा?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पुणे  : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने समान नागरी कायद्याकडे आपले लक्ष वळवले आहे. ‘समान नागरी कायदा’ हा विषय  आमच्या पूर्णपणे लक्षात आहे, असे सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे.

पुणे  : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने समान नागरी कायद्याकडे आपले लक्ष वळवले आहे. ‘समान नागरी कायदा’ हा विषय  आमच्या पूर्णपणे लक्षात आहे, असे सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे.

कांदा आणखी किती दिवस रडवणार?

पुणे मॉडेलची अंमबलबजावणी
भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा यांनी "कलम 370 रद्द केल्यानंतरची स्थिती' या विषयावर पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन नड्डा यांनी दिले.

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी आता एसीपी; पाहा कोठे झाले पोस्टिंग?

‘समान नागरी कायदा लक्षात आहे’
सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांनी उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नड्डा यांनी पुणे-श्रीनगर सिस्टर सिटी प्रस्तावाबाबत तसेच शैक्षणिक संस्थांच्या "पुणे मॉडेल' संदर्भात केंद्र सरकार योग्य ती दखल तातडीने घेईल, असे सांगितले. हा प्रस्ताव चांगला असून, त्याची सविस्तर माहिती द्या, त्याची अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले. आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना नड्डा यांनी "समान नागरी कायदा' हा विषयही आमच्या पूर्णपणे लक्षात आहे, असे सूचक विधान केले.

म्हणून, मोदींनी नेटिझन्स म्हणतायत, बाकी सब ठिक है!

‘यापूर्वीही अनेकदा मोठी संचारबंदी’
काश्‍मीरमधील सध्याची परिस्थिती सामान्य कधी होणार? यावर बोलताना नड्डा म्हणाले की, यापूर्वीही अनेकदा जम्मू-काश्‍मीरमध्ये यापेक्षाही जादा काळ संचारबंदी राहिलेली आहे. काश्‍मीरमधील परिस्थिती आता सुधारत असून, लवकरच जनजीवन सामान्य होईल. आताही परिस्थिती पूर्णपणे सामान्य आहे. जम्मू-काश्‍मीरमध्ये आता दहशतवादाचा खात्मा होण्यास अनुकूल वातावरण तयार होईल. या ठिकाणी गुंतवणूक वाढेल, शैक्षणिक सुविधा वाढतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असेही नड्डा म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader j p nadda pune speech jammu kashmir article 370