esakal | भाजपचा बारामती जिल्ह्याला विरोध...भोरमध्ये आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

bhor bjp

प्रस्तावीत बारामती जिल्ह्यात भोर तालुक्याचा समावेश करू नये, या मागणीसाठी भोर तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

भाजपचा बारामती जिल्ह्याला विरोध...भोरमध्ये आंदोलन 

sakal_logo
By
विजय जाधव

भोर (पुणे) : प्रस्तावीत बारामती जिल्ह्यात भोर तालुक्याचा समावेश करू नये, या मागणीसाठी भोर तालुका भाजपच्या वतीने तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

खडकवासला प्रकल्पात निम्म्याहून कमी साठा

बारामती जिल्हा स्थापन करण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरु झाल्या असून, त्यामध्ये भोर तालुक्याचा समावेश होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ३०) सकाळी ११ वाजता भाजपचे तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केल्यानंतर निवासी नायब तहसीलदार मृदुला मोरे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र मोरे, शहराध्यक्ष सचीन मांडके, जिल्हा कार्यकारणी सदस्य समीर वाकणकर, माजी अध्यक्ष गणेश निगडे, नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा दीपाली शेटे, शहराध्यक्षा स्वाती गांधी, विश्वास ननावरे, कपील दुसंगे, किरण दानवले, अमोर पांगारे, संजय खरमरे, विजय वाकडे, अमर ओसवाल आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

बारामतीत कोरोनाचा बारावा बळी
    
भोरपासून पुणे हे अंतर ६० किलोमीटरचे असून, भोर ते बारामती हे अंतर १०३ किलोमीटर आहे. तालुक्यातील नागरिकांना प्रत्येक वेळी एकढे अंतर जाणे शक्य होणार नाही. शिवाय नागरिकांचा वेळ आणि पैसाही खर्च होणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भोर तालुक्याचा समावेश प्रस्तावित बारामती जिल्ह्यात करू नये, अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली असल्याचे जीवन कोंडे यांनी सांगितले. तालुक्यातील इतर राजकीय पक्षांनीही याबाबत आपले मत मांडावे, असे समीर वाकणकर यांनी सांगितले.