'सरकार महत्त्वाचं की अस्मिता? शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी!'

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 January 2021

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामकरणाला विरोध केला आहे. संजय निरुपण सांगतात सरकार आमच्यामुळेच आहे. तर अशोक चव्हाण म्हणतात की, हा विषय आमच्या अजेंड्यावर नव्हता. मग यावर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट का करत नाही.

पुणे : औरंगाबाद शहराचे नामकरण संभाजीनगर करण्यासंदर्भात महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसचा विरोध आहे. या विषयावर शिवसेनेची भूमिका स्पष्ट दिसत नाही. सरकार महत्त्वाच आहे की अस्मिता महत्वाची यावर पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी रविवारी (ता.३) केली. 

पुणे शहरात कार्यक्रमासाठी आलेल्या दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर नगरसेवक दिपक पोटे, राजेश येनपुरे, संदीप खर्डेकर उपस्थित होते. औरंगाबादचे नामंतर, ईडी प्रकरण, मराठा आरक्षणसह अनेक विषयांवरून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली.

पुणे : मानलेल्या बहिणीला त्रास दिला म्हणून त्याने मित्राचा कापला गळा

ते म्हणाले, "कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामकरणाला विरोध केला आहे. संजय निरुपण सांगतात सरकार आमच्यामुळेच आहे. तर अशोक चव्हाण म्हणतात की, हा विषय आमच्या अजेंड्यावर नव्हता. मग यावर शिवसेना आपली भूमिका स्पष्ट का करत नाही. संजय राउत म्हणतात एकत्र बसून विषय मिटेल. आधी सरकार महत्वाचे कि अस्मिता यावर शिवसेनेचे आपली भूमिका स्पष्ट करावी.'' 

ईडी विरोधात रस्त्यावर उतरण्याच्या शिवसेनेच्या विषयावर बोलताना दरेकर म्हणाले, "ईडी ही स्वायत्त संस्था आहे. ईडी बाबत रस्त्यावर उतरुन आंदोलन करणे म्हणजे लोकशाहीच्या विरोधात काम करण्यासारखे आहे. अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा हा प्रयत्न घातक आहे.'' एकनाथ खडसे म्हणाले होते, माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी काढतो. ते सद्या सीडी शोधताय, अशी टिप्पणी दरेकर यांनी केली. 

पधारो म्हारे देस; उजनी धरण परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमण​

माझीसुध्दा तात्काळ चौकशी करावी
विरोधक बॅंकेसंदर्भात दरेकर यांची चौकशी करण्याची मागणी करत आहे, यावर विचारले विचारला असता दरेकर म्हणाले, "मी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. मी चौकशीला घाबरत नाही. तात्काळ चौकशी करावी.'' 

दरेकर म्हणाले -
* पुणे शहर भाजपमध्ये गटबाजी नाही. 
* शहराचे नाव बदलून काहीही साध्य होत नाही. 
* नाव बदलण्यासंदर्भात भाजपची भूमिका पक्षश्रेष्ठी जाहीर करतील. 
* आमच्या सरकारच्या काळात नामकरणाचा प्रस्ताव आला नव्हता. 

औरंगाबादनंतर आता पुण्याच्या नामांतराची मागणी​

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP opposition leader Pravin Darekar criticized shivsena about renaming of Aurangabad and party agenda