'भाजपचे माझं आंगण माझं रणांगण' या आंदोलनाकडे कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

bjp
bjp

पुणे : भारतीय जनता पक्षाचे 'माझं आंगण माझं रणांगण' या आंदोलनाकडे नेते वगळता कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. महाराष्ट्र प्रदेश भाजपने शुक्रवारी सकाळी दहा ते अकरा दरम्यान काळे कपडे घालून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा निषेध करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यासाठी बैठकाही घेतल्या होत्या. या आंदोलनासाठी भाजपने जय्यत तयारी केली होती. परंतु, या अंदोलनाला भाजपच्याच कार्यकर्त्यांनी पाठ फिरवल्याचे काहीशे चित्र पाहायला मिळाले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

महाराष्ट्रातील विविध भागात भाजपचे ज्येष्ठ नेते या आंदोलनात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आणि खासदार रक्षा खडसे ही पक्षाच्या आंदोलनात सहभागी झाले होते. 'उद्धवा अजब तुझे सरकार' असा फलक एकनाथ खडसे यांच्या हातात तर 'महाराष्ट्राची जनता मृत्यूच्या दारात आणि उद्धव सरकार आपल्या घरात' असा फलक रक्षा खडसे यांच्या हातात पाहायला मिळाला.
--------
१९९९पासून आतापर्यंतच्या चक्रीवादळावर एक नजर
--------
भारताचा भूभाग आपल्या नकाशात दाखवण्याचं धाडस
--------
सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार
---------
परंतु, कार्यकर्त्यांकडून फारशे कोठेही समर्थन केले गेलेले पाहायला मिळाले नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेनेही भाजपच्या या आंदोलनाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे आंदोलन सकाळी सकाळी दहा ते साडेदहा दरम्यान पुण्यात होते तर, राज्याच्या विविध भागात सकाळी अकरा ते साडेअकरा दरम्यान होते. त्यानुसार सोशल मिडीयावर त्याच्या पोस्ट पडू लागल्या. परंतु, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पोस्टवर तिखट, नकारात्मक प्रतिक्रियांचा पाऊस सुरू केला. त्यासाठी महाराष्ट्रद्रोहीभाजप असा ट्रेंड त्यांनी चालविला. ट्विटरवर तर हा ट्रेंड ट्रेंडींगमध्ये होता. भाजपचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश बापट, आशिष शेलार, राम कदम, प्रसाद लाड, चित्रा वाघ, जगदिश मुळीक यांच्या पोस्ट पडल्यावर त्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केले तर, आघाडीचे जयंत पाटील, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, चारूलता टोकस, वंदना चव्हाण आदींनीही भाजपच्या आंदोलनावर टीका करणाऱया पोस्ट व्हायरल केल्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com