esakal | इंदापूरमध्ये भाजपकडून वीजबिलांची होळी
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरमध्ये भाजपकडून वीजबिलांची होळी

इंदापूर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने अन्यायकारक वीजबिले जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

इंदापूरमध्ये भाजपकडून वीजबिलांची होळी

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : लॉकडाउन काळातील वीजबिल वसूलीचा सरकारने काढलेला जुलमी फतवा अन्यायकारक आहे. राज्यातील जनता व शेतकरी सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत असल्याने शासनाने हा फतवा मागे घेऊन, लॉकडाउन काळातील वीजबिल माफीचा आदेश तात्काळ काढावा, अशी मागणी भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली.

२००५ नंतरच्या शिक्षकांना पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार : चंद्रकांत पाटील

इंदापूर येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वतीने अन्यायकारक वीजबिले जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला.

यावेळी बेलताना पाटील म्हणाले, ''जनतेने ऊर्जा मंत्र्यांकडे लॉकडाउन काळातील वीजबिले माफ करण्याबाबत मागणी केल्यानंतर दिलासादायक निर्णय घेऊ, असे आश्वासन ऊर्जामंत्र्यांनी दिले होते. परंतू नंतर ऊर्जामंत्र्यांनी  मीटर रिडींग प्रमाणे आलेली वीजबिले माफ होणार नाहीत अशी भूमिका घेतल्यानंतर वीज वितरण कंपनीने विजबिले वसुलीचा जनतेकडे तगादा लावला आहे.

पुण्यात लवकरच सुरु होत आहे वैद्यकीय महाविद्यालय

सरकारने आश्वासन न पाळून राज्यातील ग्राहक, उद्योजक व शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. वाढीव वीजबिल आकारणी, संगणकीय चुका यासारख्या अनेक चुका या सरकारने केल्या असल्याने जुलमी वीजबिलांची होळी करण्यात आली. आज तालुक्‍यात ट्रान्सफॉर्मर जळाला तर मिळत नाही. तालुक्यातील २० ते २५ गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद आहेत. मंत्री म्हणून आपण मिरवता परंतू जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी अपयशी ठरले आहेत. शंभर टक्के वीजबिल माफ करू, संपूर्ण कर्जमाफी करू, मराठा आरक्षण, धनगर आरक्षणाचे प्रश्न सोडवू असे आश्वासन या लोकप्रतिनिधीने दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून भरपाई मिळाली नाही. लोकप्रतिनिधी सरकारचे प्रतिनिधी असल्याने त्यांची जबाबदारी आहे. अनेक प्रश्न सोडविण्यात तालुक्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याने नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे.'' 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष ॲड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकील सय्यद, ॲड. कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले यांची भाषणे झाली. हर्षवर्धन पाटील यांच्यामार्फत महावितरणचे उपअभियंता रघुनाथ गोफणे यांना वीजबिल माफीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

(संपादन : सागर डी. शेलार)

loading image
go to top