esakal | इंदापुरातील आंदोलनावेळी भाजपकडून नागरिकांना दुधाचे वाटप
sakal

बोलून बातमी शोधा

kalamb

दुधाला वाढीव भाव मिळावा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने इंदापूर तालुक्यातील मदनवाडी चौफुला व कळंब येथे आदोलन करण्यात आले. कळंब येथे दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. तर, मदनवाडी चौफुला येथे महसूल व पोलिस विभागाचे प्रतिनिधी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

इंदापुरातील आंदोलनावेळी भाजपकडून नागरिकांना दुधाचे वाटप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : दुधाला वाढीव भाव मिळावा, या मागणीसाठी भाजपच्या वतीने इंदापूर तालुक्यातील मदनवाडी चौफुला व कळंब येथे आदोलन करण्यात आले. कळंब येथे दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. तर, मदनवाडी चौफुला येथे महसूल व पोलिस विभागाचे प्रतिनिधी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

भिगवण : दुधाचे दर घसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून, तातडीने भाव वाढ द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे आंदोलनकर्त्यांनी सरकारला दिला आहे.

या वेळी भाजपच्या वतीने महसूल व पोलिस विभागाचे प्रतिनिधी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मारुती वणवे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वणवे, रंगनाथ देवकाते, पराग जाधव, संपत बंडगर, तेजस देवकाते, अशोक शिंदे, दिलीप कुंभार, ज्ञानेश्वर मारकड, विकास वाघ, खंडेराव गाडे, संदीप खुटाळे आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

या वेळी दुधाला प्रतिलिटर दहा रुपये भाव वाढ द्यावी, दूध पावडर निर्यातीला प्रती किलो पन्नास रुपये अनुदान द्यावे, अतिरिक्त दूध सरकारने खरेदी करावे, आदी मागण्या करण्यात आल्या. या वेळी रंगनाथ देवकाते, अशोक शिंदे, संपत बंडगर यांनी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे दुधाला दरवाढ तातडीने द्या अशी मागणी केली. मारुती वणवे यांनी प्रास्ताविक, तर राजेंद्र जमदाडे यांनी सुत्रसंचालन केले. अशोक वणवे यांनी आभार मानले. आंदोलनामध्ये भिगवण व परिसरातील शेतकरी व भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते.


वालचंदनगर : कळंब (ता. इंदापूर) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. या वेळी गावातील नागरिकांना दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. या आंदोलनामध्ये माजी सभापती प्रदीप पाटील, रणजित पाटील, भाऊसाहेब अर्जुन, चंद्रकांत कांबळे, महादेव कुंभार, शिवाजी कोळी, हरिदास मोरे यांच्यासह शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.