esakal | भाजपचे कार्यकर्ते म्हणतात, देवा...सरकारला बुध्दी दे...
sakal

बोलून बातमी शोधा

uruli bjp

दुधाला प्रतिलिटर दहा रुपये भाव वाढ मिळावी, दूध पावडर निर्यातीला प्रती किलो पन्नास रुपये अनुदान द्यावे व अतिरिक्त दुध शासनाने खरेदी करावे, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्व हवेलीचे अध्यक्ष सुनील कांचन यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

भाजपचे कार्यकर्ते म्हणतात, देवा...सरकारला बुध्दी दे...

sakal_logo
By
जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : देवा, दूध दरवाढ करण्यासाठी सरकारला बुध्दी दे...झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला त्वरित जागे कर, सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा येऊ दे, अशा हटके घोषणा देत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एलाईट चौकात दूध दरवाढीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. १) सकाळी दगडावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले. 

निवृत्तीनंतर झेडपी शाळांचे आधरवड बनले सातकर गुरुजी

दुधाला प्रतिलिटर दहा रुपये भाव वाढ मिळावी, दूध पावडर निर्यातीला प्रती किलो पन्नास रुपये अनुदान द्यावे व अतिरिक्त दुध शासनाने खरेदी करावे, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाचे पूर्व हवेलीचे अध्यक्ष सुनील कांचन यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. शासनाने या मागण्यांचा त्वरीत विचार न केल्यास भविष्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा या वेळी सुनील कांचन यांनी सरकारला दिला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रविण काळभोर, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जगताप, पक्षाचे उरुळी कांचनचे शहराध्यक्ष श्रीकांत कांचन, संदिप तांबे, भाऊसाहेब कांचन, गुरुनाथ मचाले, सुनील गायकवाड, गणेश चौधरी, मच्छिंद्र कड, ओंकार कांचन आदी उपस्थित होते.

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

या वेळी प्रविण काळभोर म्हणाले की, विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांपेक्षा दुधाची विक्री करणाऱ्या दलालांचा अधिक पुळका आहे. मागिल पाच वर्षात फडणवीस सरकारने दुधाचे दर कोसळताच शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देऊन शेतकऱ्य़ांच्या संसाराला टेकू दिला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांकडून १८ ते २० रुपये दराने दुधाची खरेदी चालू असतानाही सरकार झोपेचे सोंग घेऊन गप्प राहत आहे. शेतकऱ्याला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी दुधाला प्रतिलिटर दहा रुपये भाव वाढ मिळावी, दूध पावडर निर्यातीला प्रती किलो पन्नास रुपये अनुदान द्यावे व अतिरिक्त दुध शासनाने खरेदी करा,वे या प्रमुख मागण्या पूर्ण करण्याची गरज आहे. शासनाने या मागण्या पूर्ण न केल्यास भारतीय जनता पक्ष आणखी आक्रमक होणार आहे.