Itians : परदेशी कंपन्यांतील आयटीयन्सना झटका!

जगभरातील काही बड्या देशांत निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे अनेक क्षेत्रे प्रभावित झाली असून त्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाचा देखील समावेश आहे.
Itians
ItiansSakal
Summary

जगभरातील काही बड्या देशांत निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे अनेक क्षेत्रे प्रभावित झाली असून त्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाचा देखील समावेश आहे.

पुणे - जगभरातील काही बड्या देशांत निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्चिततेमुळे अनेक क्षेत्रे प्रभावित झाली असून त्यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाचा देखील समावेश आहे. अस्थिरतेचा देशातील आयटी क्षेत्रावर थेट परिणाम झाला नसला तरी त्याचे अप्रत्यक्ष परिणाम परदेशी आयटी कंपन्यांत कार्यरत असलेल्या आयटीयन्सना सहन करावे लागत आहेत.

अमेरिकेसह अनेक बड्या देशांत आर्थिक मंदीचे सावट निर्माण झाले आहे. त्यामुळे तेथील कंपन्यांनी कर्मचारी कमी करण्यास सुरुवात केली आहे. या कंपन्यांत भारतीय आयटीयन्सची संख्या मोठी आहे. त्यामुळे यातील अनेक भारतीय आयटीयन्सने नोकरी गमावली आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देण्याची तरतूद तेथील कामगार कायद्यांत आहे. त्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणे खर्चिक ठरत असल्याने त्यांना कामावर ठेवून इतर देशांतील नोकरदारांना कमी केले जात आहे.

अचानक कामावरून काढल्यानंतर आर्थिक संकट ओढवू नये म्हणून नुकसान भरपाई देण्यात यावी, किंवा एकरकमी रक्कम दिली जावी. त्यामुळे जोपर्यंत चांगली दुसरी नोकरी मिळणार नाही, तोपर्यंत नोकरदाराला आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही, अशी मागणी आता नोकरी गमावलेले आयटीयन्स करीत आहे.

जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील आयटी क्षेत्रातील मनुष्यबळ स्वस्त असल्याने येथून मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जाते. कंपन्यांच्या व्यवस्थापनाच्या खर्चात कपात व्हावी म्हणून अनेक परदेशी आयटी कंपन्यांनी भारतातच त्यांची कार्यालये सुरू केली आहेत. परदेशातून या कार्यालयांना प्रोजेक्ट पाठवले जातात. अशा कार्यालयांत कर्मचाऱ्यांमध्ये सध्या अस्थिरता आहे.

अमेरिकेसह इतर प्रगत देशांत निर्माण झालेल्या आर्थिक अनिश्‍चिततेचा येथील आयटी क्षेत्रावर थेट मोठा परिणाम झालेला दिसत नाही. पण भारतात कार्यालय असलेल्या परदेशी कंपन्यांच्या अनेक आयटीयन्सना नोकरी गमवावी लागली आहे. तर परदेशात कार्यरत असलेल्यांवर देखील अचानक बेरोजगारी आली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता नोकरी गमाविलेल्या आयटीयन्सना परदेशातील कायद्याप्रमाणे भारतात देखील नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. या मुद्द्याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे.

- पवनजीत माने, सदस्य, राज्य आयटी कमिटी

आयटीयन्सना यामुळे टेन्शनमध्ये

  • अमेरिकेसह इतर देशांत निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती

  • आर्थिक अस्थिरतेमुळे नोकरी जाण्याची वाढलेली शक्यता

  • बड्या कंपन्यांत होत असलेली नोकर कपात

  • अचानक आलेल्या बेरोजगारीचा जीवनशैलीवर होणारा परिमाण

  • व्यवसाय कमी झाल्याने भारतातील कार्यालये बंद करीत असलेल्या कंपन्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com