बोरीभडक जवळ कालव्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 11 January 2021

बोरीभडक- बोरीऐंदी दरम्यान असलेल्या मुळा मुठा कालव्याच्या पुलावरून ते दुचाकीसह कालव्यात कोसळले. यांपैकी विशाल आढाव यास वाचवण्यास स्थानिक नागरिकांना यश आले. मात्र गौरव कांचन दुचाकीसह बेपत्ताच होता.

यवत(पुणे) : रात्रीच्या सुमारास बोरीऐंदी- बोरीभडक दरम्यान दुचाकीवरून प्रवास करणाऱे दोन तरूण कालव्यात कोसळले. त्यातील एका तरूणास वाचवण्यास स्थानिक नागरीकांना यश आले. मात्र दुसरा तरूण आणि दुचाकी बेपत्ता होते. घटनेस दोन रात्री आणि एक दिवस उलटून गेला होता. मात्र आज सकाळी आपत्ती व्यवस्थापन पथकाला हा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. 

पुण्यात 'I Love Narhe' पॉईंटजवळ भूमकर पुलावर भीषण अपघातात 2 ठार तर 3 जखमी

उरूळी कांचन (ता. हवेली) येथे राहणारे विशाल प्रदीप आढाव (वय 23) व गौरव शशिकांत कांचन (वय 20) शनिवारी (ता.9) रात्रीच्या सुमारास बोरीभडक उरूळी कांचन दरम्यान दुचाकीवरून प्रवास करत होते.

बोरीभडक- बोरीऐंदी दरम्यान असलेल्या मुळा मुठा कालव्याच्या पुलावरून ते दुचाकीसह कालव्यात कोसळले. यांपैकी विशाल आढाव यास वाचवण्यास स्थानिक नागरिकांना यश आले. मात्र गौरव कांचन दुचाकीसह बेपत्ताच होता. स्थानिक नागरीकांच्या मदतीने यवत पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र यश येत नसल्याने पाहून आज सकाळी  आपत्ती व्यवस्थापन पथकास पाचरण करण्यत आले होते. काही काळातच त्यांना घटना स्थळापासून दोन किमी अंतरावर मृतदेह सापडला.  

वाकड ब्रिजजवळील खासगी ट्रॅव्हल्स व ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू

अपघात स्थळी कालव्याच्या पाण्याला काहीसा वेग आहे. ही गोष्ट खरी असली तरी दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतरही काहीच हाती लागले नाही. किमान कालव्यात पडलेली दुचाकी तरी हाती लागावयास हवी होती. त्यामुळे नागरीकांमधून विविध शांकांवर चर्चा वाढू लागली होती. तर दुसरीकडे अपघात झाला तेंव्हा काही प्रत्यक्ष दर्शनींनी एकास वाचवले आहे. त्यामुळे शंकांना जागाही नव्हती. अशा स्थितीत आपत्ती व्यवस्थापन पथकाला मृतदेह शोधण्यात यश मिळाले आहे. दरम्यान काल दौंडचे आमदार राहुल कुल यांनी घटनास्थळाला भेट देऊन सुरू असलेल्या तपास कामाचा आढावा घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the body of boy was found lying in a canal near Boribhadak