पुणे विमानतळावर बॉडी स्कॅनर अन लाऊंजही !

Body scanner and lounge at Pune airport
Body scanner and lounge at Pune airport

पुणे : विमानतळावर सिक्युरिटी चेक इनचा प्रवाशांना लागणारा वेळ कमी करण्यासाठी प्रशासनाने लोहगाव विमानतळावर एक बॉडी स्कॅनर मंगळवारी (ता.15) कार्यान्वित केला.

अवघ्या काही सेकंदात यामध्ये प्रवाशाची तपासणी होणार आहे. सध्या सुमारे 03 महिन्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा स्कॅनर कार्यान्वित राहणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशातील 200 विमानतळांवर असे बॉडी स्कॅनर बसविण्याचा भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा प्रस्ताव आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजयकुमार यांनी दिली.

पाश्चात्य देशांत अनेक ठिकाणी 'सिक्युरिटी चेक इन' बॉडी स्कॅनरद्वारे होत आहे. त्या धर्तीवर आता पुण्यात प्रयोग सुरू झाला आहे. 

बार आणि लाऊंजही
लोहगाव विमानतळावर आता पहिल्या मजल्यावर तब्बल 2 हजार चौरस फुटांचा बार आणि लाऊंजही कार्यान्वित झाला आहे. हा लाऊंज 24 तास प्रवाशांसाठी खुला असेल. 'कॅसिनो एअर केटरर्स अँड फ्लाईट सर्व्हिसेस' या प्रसिद्ध कंपनीकडून त्याचे संचलन होणार आहे. देशातील अनेक विमानतळांवर या कंपनीचे लाऊंज आहेत. येथील विमानतळावर तळमजल्यावरही या पूर्वीच बार अँड लाऊंजची सुविधा असून आता त्यात आणखी एका लाऊंजची भर पडली आहे .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com