वेल्हे तालुक्यात पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थी 

वेल्हे तालुक्यात पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थी 

वेल्हे (पुणे) : तालुक्यात पीएम किसान योजनेत अनेक बोगस नावे उघडकीस आली आहेत. सातबारावर नावे नसताना या योजनेचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिंदे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वेल्हे तालुका हा भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने कमी असल्याने येथे शेती क्षेत्रही कमी आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू झालेल्या या योजनेचा लाभ सहा ते साडेसहा हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. 

परंतु महसुल विभागाच्या असे निदर्शनास आले  आहे की, या योजनेचा अनेक बोगस लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा नसताना तसेच एकाच घरातील अनेक व्यक्तींनी याचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे. 

तहसील कार्यालयाकडून मिळलेल्या माहितीनुसार, खालील बोगस व्यक्तींची नावे- आकाश बापू जाधव, अश्विनी बापू जाधव, मोनाली बापू जाधव, मुक्ताबाई बाजीराव सरपाले, रुपेश बाजीराव सरपाले, योगेश बाजीराव सरपाले, छाया रुपेश सरपाले, चंद्रकांत नामदेव सरपाले, देविदास दामू गिरंजे, केतन आनंदा सरपाले, निलेश आनंदा सरपाले, पूजा संदीप सरपाले, सदाशिव चंदर सरपाले, साधना चंद्रकांत सरपाले, संदीप शंकर सरपाले, उल्हास निवृत्ती बढे, वसंत लक्ष्मण खोपडे, बायडाबाई आनंदा सरपाले, संदीप ( पूर्ण नाव माहीत नाही) ही सर्व राहणार सोंडे सरपाले, सोंडे हिरोजी परिसरातील असून अशा वीस व्यक्तींची नावे उघड झाली असून यांनी शासनाची फसवणूक करून अनुदान लाटण्याचा प्रयत्न केल्याबाबत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा का करून नये याबाबत १६ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावण्यात आली असून याबाबत लेखी खुलासा करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जर या योजनेचा बोगस लाभ ज्यांनी घेतला असेल त्यांनी स्वतःहून पुढे यावे, अन्यथा संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आवाहन तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी केले आहे. 


गावनिहाय सर्वे होणे आवश्यक...वेल्हे तालुक्यात अनेक सुशिक्षित व सधन घरातील व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतल्याने शासनाची मोठी फसवणूक होणार आहे. याबाबत तालुक्यातील प्रत्येक लाभार्थ्यांचा गावनिहाय सर्वे होणे आवश्यक आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com