
धनकवडी : बुद्धीच्या देवतेला पुस्तकांचा नैवेद्य अर्पण करून सलग चौथ्या वर्षी धनकवडीतील ११ गणेश मंडळांनी संयुक्त मिरवणुकीचे आयोजन केले आहे. यंदा मिरवणुकीत मराठी भाषेचा गौरव रथ असून, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी व मराठी भाषेला साहित्य, नाटक, कथा व कवितेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांची चित्रे या रथात असणार आहेत.