पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी खूनाच्या घटनेनं खळबळ

Murder
Murderesakal
Updated on

पुणे(Pune) : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशीही खुनाची घटना घडली आहे. सिंहगड रस्ता(sinhagad Road) परिसरात मंगळवारी मध्यरात्री टोळक्याकडून तरुणाचा खून (Murder) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आहे आला आहे. तलवारीने सपासप वार केल्यानं एकाचा मृत्यू (Death) तर दुसरा गंभीर जखमी(Injured) झाला आहे. सिंहगड रोड पोलिस(Police) ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Boy Murdered and 1 injured at Sinhagad Road In Pune)

पुण्यात काल (ता. 5) शहरातील वेगवेगळ्या दोन खूनाच्या घटना घडल्या आहेत. फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारचा तडीपार गुंडाने चाकूने गळा चिरून खून केला तर वेश्यावस्तीत एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा देखील चाकूने भोसकून खून करण्यात आल्याच्या घटना काल घडल्या. दरम्यान गेल्या 24 तासात पुन्हा आणखी एक खूनाची घटना घडली आहे त्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण परसले आहे

Murder
पुण्यात लसीकरणाचा महागोंधळ

दरम्यान, सिंहगड परिसरात टोळक्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या तरुणाचे नाव शाम सोनटक्के (वय 24) असे असून योगेश चव्हाण(वय 19) गंभीर जखमीझाला आहे. योगेश आणि शाम यांच्यासह त्यांच्या मित्रांची दारूची पार्टी सुरू होती.पार्टी सुरू असतांनाच पूर्ववैमनस्यातून टोळक्याने हल्ला केला. मोन्या पोकळे असे मुख्य संशयिताचे नाव असून त्याच्यासह त्याच्या साथीदारांचा शोध पोलिस घेत आहे.

Murder
भंगार गोळा करणाऱ्यावर आली उपासमारीची वेळ

पुण्यात पोलिस हवालदाराचा खून

पुणे : फरासखाना पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारचा तडीपार गुंडाने चाकूने गळा चिरून खून केला. ही घटना मंगळवारी (ता. ४) रात्री सव्वा बाराच्या सुमारास बुधवार पेठेतील श्रीकृष्ण थिएटरजवळ घडली. खून करणा-यास पोलिसांनी अटक केली आहे. समीर जमील सय्यद (वय ४८, रा. खडक पोलिस लाईन, शुक्रवार पेठ) असे खून झालेल्या हवालदाराचे नाव आहे. सराईत गुन्हेगार प्रवीण श्रीनिवास महाजन (रा.कसबा पेठ) याला खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Murder
रेशन दुकानदारांचा संप स्थगित, रेशन दुकाने आजपासून उघडणार

देहविक्री करणाऱ्या महिलेचा खून :

सय्यद यांचा खून झाल्याचे उघडकीस आल्यानंतर वेश्यावस्तीत एका देहविक्री करणाऱ्या महिलेचा देखील चाकूने भोसकून खून करण्यात आला. राणी मुनाफ शेख (वय ३६, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणीफरासखाना पोलिसांनी बखर नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Murder
हडपसरवरून गाठले धायरी; तब्बल तीन तास थांबल्यानंतर लसीकरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Residents of remote Khopadewadi village near Rajgad Fort were forced to perform a funeral under a tarpaulin in heavy rain due to the absence of a crematorium, highlighting the lack of basic infrastructure in the region.
Nirmala Nawale NCP appointment
Garbage bins overflowing near the entrance of Padmashri Dr. Manibhai Desai Arts and Commerce College in Uruli Kanchan have triggered concerns over hygiene and student safety, with residents questioning the Gram Panchayat's waste management.
JCBs and Poclains Ravage Pune Hills; Environmentalists Raise Alarm
Marathi News Esakal
www.esakal.com