फोरटीक्‍स न्यूट्रीमिक्‍स : एक सोपा आणि सोईस्कर स्वास्थ्यवर्धक फोरटीक्‍स न्यूट्रीमिक्‍स

fortix.jpg
fortix.jpg

जगाच्या सद्य परिस्थितीत सर्वांच्या आयुष्यात आरोग्याने प्रथम स्थान पटकावले आहे. आपण स्वतः तसेच आपल्या कुटुंबाला स्वस्थ, निर्धोक आणि सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो.आहाराचा परिणाम शरीरावर होतो आणि आहार व आजार यांचा जवळचा संबंध आहे. जीवनसत्त्वे अथवा खनिजांच्या कुपोषणाने होणारे आजार तसेच जिवाणू अथवा विषाणूजन्य रोगांना आळा हा पोषक आहाराद्वारे घातला जाऊ शकतो. बदलत्या जीवनशैलीतील कामाच्या दबावामुळे व चटपटीत खाण्याच्या सवयीमुळे आपण समतोल पोषक आहार घेऊ शकत नाही.

पोषक आहाराचा हा प्रश्न कसा सोडवायचा?
फोरटीक्‍स न्यूट्रीमिक्‍स कडे या प्रश्नाचे उत्तर आहे. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर प्रणव आणि करण कोरके यांनी हा आपल्या सर्वांच्या स्वास्थ्यासाठी सुरू केलेला एक अभिनव उपक्रम आहे.

काय आहे फोरटीक्‍स न्यूट्रीमिक्‍स?
फोरटीक्‍स न्युट्रिमिक्‍स हे पौष्टिक बूस्टर आहेत जे तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये - जसे की पीठे, भात, दूध इत्यादी - मिळवून तुम्ही खाऊ शकता. रोजच्या खाण्याच्या चवीत किंवा स्वरूपात न बदल करता तुमच्या परिवाराची पौष्टिक तत्त्वांची पूर्तता करण्याचा हा एक सोपा आणि सोईस्कर मार्ग आहे. शरीर पोषण व संवर्धनासाठी संमिश्र पोषणमूल्यांनी परिपूर्ण आहे फोरटीक्‍स न्यूट्रीमिक्‍स उत्पादनात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्‍स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी. या अत्यावश्‍यक जीवनसत्त्वं बरोबरच झिंक व आयर्न अशी अत्यंत जरुरीची पौष्टिक तत्त्वे शरीरासाठी योग्य प्रमाणात असतात, ज्याच्यामुळे परिपूर्ण आरोग्य मिळू शकते.

फोरटीक्‍स न्युट्रिमिक्‍स खरोखरच काम करते का?
फोरटीक्‍स न्यूट्रीमिक्‍सची पूरक आहाराची संकल्पना व प्रक्रिया जागतिक स्वास्थ्य संघटना (WHO) द्वारे स्वीकृत आहे. बऱ्याच देशात कुपोषण विरुद्ध लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून ही संकल्पना आवश्‍यक घटक म्हणून घोषित केले आहे. भारत सरकार सुद्धा त्यांच्या ‘स्वस्थ भारत अभियान’ तर्फे प्राथमिक स्तरावर या संकल्पनेचा वापर करत आहे. आम्ही या उत्पादनातून सरकारच्या पोषण आहाराच्या मोहिमेत सहभागी आहोत.

संकेतस्थळ : www.fortix.in   संपर्क : ९३०७९४७८३९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com