क्रस्ना डायग्नोस्टिक्स प्रा.लि. : आरोग्य क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव

Krsnaa-Diagnostic
Krsnaa-Diagnostic

क्रस्ना डायग्नोस्टिक्स प्रा.लि. ही संस्था आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. आरोग्य तपासणी आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असताना ही संस्था राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन या शासकीय योजनेअंतर्गत भारतातील १५ राज्यांमध्ये सर्वसामान्यांना परवडेल अशा दरांत आरोग्य तपासणी सेवा देत आहे. त्यामध्ये सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., एक्स-रे तसेच पॅथोलॉजी या सेवांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पल्लवी जैन या क्रस्ना डायग्नोस्टिक्स प्रा.लि.च्या सह-संस्थापक तसेच मॅनेजिंग डायरेक्टर असून, त्यांच्या संकल्पनेतून संस्था विविध उपक्रम राबवीत आहे. पल्लवी जैन यांच्या दूरदृष्टी प्रकल्पांच्या माध्यमातून संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर या ठिकाणी ही संस्था आरोग्य सुविधा देत आहे. पुणे येथे पुणे महापालिकेसोबत सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर कमला नेहरू रूग्णालय, मंगळवार पेठ आणि स्व. जयाबाई नानासाहेब सुतार रूग्णालय, कोथरूड या ठिकाणी सी.टी. स्कॅन, एम.आर.आय., एक्स-रे आणि पॅथोलॉजी सेवा शासकीय दरात देत आहे. याव्यतिरिक्त महापालिकेच्या जवळपास ६५ रूग्णालयांमध्ये रक्तनमुना संकलन केंद्र सुरू केली आहेत. ज्यामुळे नागरिकांना रक्त-लघवी तपासणीसाठी थेट रूग्णालयात येण्याची आवश्यकता नाही. जवळच्या मनपाच्या रूग्णालयात जाऊन ते रक्त-लघवी नमुने तपासणीसाठी देऊ शकतात.

सध्या कोरोना या आजाराने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. आपल्याकडे देखील या आजाराचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. एक आरोग्य निदान संस्था या नात्याने आणि सामाजिक बांधीलकी जपत क्रस्ना डायग्नोस्टिक्स प्रा.लि. या संस्थेने पुणे येथे सुसज्ज अशी ICMR प्रमाणित ‘कोविड-१९’ नमुना तपासणी प्रयोगशाळा सुरू केली. या ठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या दरामध्येच ‘कोविड-१९’ तपासणी केली जाते. तसेच होम कलेक्शन सुविधा देखील उपलब्ध असल्याने नागरिकांना याचा फायदा होत आहे. आतापर्यंत हजारो रूग्णांनी ‘कोविड-१९’ स्वॅबची RT-PCR तपासणी करून घेतली आहे.

पुण्यासोबतच नवी मुंबई, नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि अहमदनगर याठिकाणी देखील ICMR प्रमाणित ‘कोविड-१९’ नुमना तपासणी प्रयोगशाळा सुरू असून, महाराष्ट्रातील असंख्य रुग्णांची तपासणी केली गेली आहे. ‘कोविड-१९’ स्क्रिनिंग ही देखील कोरोना आजार ओळखण्याची प्राथमिक तपासणी आहे. रूग्णांना अगदी घराजवळ ‘कोविड-१९’ स्क्रिनिंग करता यावे यासाठी संस्थेने ‘कोविड-१९’ बससेवा सुरू केली. यामध्ये ‘कोविड-१९’ची प्राथमिक तपासणी (स्क्रिनिंग) तज्ज्ञांकडून केली जाते. यामुळे नागरिकांना घराजवळच आरोग्य सुविधा मिळू लागली. हजारो नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळाला आहे.

संवत्सरी महापर्व की सभी को बधाई 
एवं सभी को तह दिल से क्षमायाचना

संकेतस्थळ : www.krsnaadiagnostics.com
हेल्पलाईन नं. : 020 4695 4695 / 96233 96233

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com