esakal | कुलकर्णी लाडूवाले : स्वादिष्ट व दर्जेदार उत्पादनाची परंपरा
sakal

बोलून बातमी शोधा

Kulkarni-Laduwale

संतोष रमेशराव कुलकर्णी (मूळ गाव बार्शी, जि. सोलापूर) नोकरीचे शोधार्थ पुणे येथे साधारणतः: १९८५-८६च्या दरम्यान आले. अंबरीषवरद श्री भगवान म्हणून बार्शी गावाची ख्याती असली, तरी पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी संतोष यांनी बार्शी सोडली. बार्शीमध्ये असल्यापासूनच व्यवसायाचे बाळकडू त्यांना आईकडूनच मिळालेले होते.

कुलकर्णी लाडूवाले : स्वादिष्ट व दर्जेदार उत्पादनाची परंपरा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

संतोष रमेशराव कुलकर्णी (मूळ गाव बार्शी, जि. सोलापूर) नोकरीचे शोधार्थ पुणे येथे साधारणतः: १९८५-८६च्या दरम्यान आले. अंबरीषवरद श्री भगवान म्हणून बार्शी गावाची ख्याती असली, तरी पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी संतोष यांनी बार्शी सोडली. बार्शीमध्ये असल्यापासूनच व्यवसायाचे बाळकडू त्यांना आईकडूनच मिळालेले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यात आल्यानंतर त्यांना बिवडेवाडी येथील अमित कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये नोकरी मिळाली. तिथेच त्यांचे गुरू श्री. आनंदभाई व कै. सौ. आशाताई गुजराथी यांचे बहुमोल मार्गदर्शन, स्नेह आणि जिव्हाळा त्यांना मिळाला. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच कुलकर्णी स्वत:च्या व्यवसायाचा पाया घालू शकले. त्यांनी १९९९ मध्ये ‘कुलकर्णी लाडूवाले’ या बॅनरखाली स्वत:च्या घरातूनच हा व्यवसाय सुरू केला.

ज्ञानेश्‍वर माऊलींच्या उक्तीप्रमाणे ‘इवलेसे रोप, लावियेले व्दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ स्वत:च्या घरातूनच सुरू झालेला हा प्रवास नावारूपास आला आहे. त्यांनी २०१०मध्ये अत्याधुनिक मशीन घेऊन, मोठ्या जागेत व्यवसायाची वाढ केली. मालाचा उत्तम दर्जा, जिभेवर रेंगाळणारी चव, चोखंदळ पुणेकर ग्राहकांची पसंती आणि त्यामुळे मिळणारा उत्तम प्रतिसाद, हे सर्व जाणून घेत त्यांनी १५ विविध प्रकाराचे लाडू ग्राहकांसाठी उपलब्ध केले आहेत. काळाची गरज ओळखून, साखर न खाणाऱ्या ग्राहकांसाठी, त्यांच्या मागणीनुसार, लाडूचे अनेक प्रकार गुळामध्ये बनविले जातात. एका बेसन लाडूपासून सुरू केलेला हा व्यवसाय पुढे मूग लाडू, नाचणी लाडू, डिंक लाडू, खजूर लाडू, शेंगदाणा लाडू, सप्तधान्य लाडू, कणीक मेथी लाडू, उपवास लाडू, पंचखाद्य लाडू अशा अनेक पौष्टिक प्रकारांमध्ये विस्तारला आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांना डब्याला खाऊ असो,  नैवेद्यासाठी असो, प्रसंगी समारंभात भेट देण्यासाठी असो अथवा वृद्ध लोकांसाठी असो ‘कुलकर्णी लाडूवाले’ यांचे विविध प्रकार गृहिणी नेहमीच पसंत करतात. त्यामुळेच त्यांनी व्यवसायाचे स्वरूप पुण्यापुरते सीमित न ठेवता, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नाशिक इत्यादी ठिकाणीही व्यवसाय वाढविला आहे.

कामगार हा एक आपला महत्त्वाचा घटक समजून व त्यांच्या अडचणींकडे लक्ष देत असल्याने, ते अतिशय समाधानाने व आनंदाने टिकून काम करतात.

बदललेल्या सवयी, वेळेचा अभाव, सततची धावपळ, कामाचा ताण आणि पदार्थ तयार करण्यास वेळ न मिळाल्यामुळे अनेक गृहिणी ‘कुलकर्णी लाडू’ पसंत करतात.  त्यांचा विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी, मालाचा उत्तम दर्जा, सर्व प्रकारची स्वच्छता, सरकारी नियमांचे काटेकोर पालन करत, हा ब्रॅन्ड घरोघरी पोचविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आमचे कुटुंबीय काम करत आहोत. गेल्या पाच वर्षांपासून माझा मुलगा चैतन्य स्वत:चे शिक्षण सांभाळून व्यवसायात लक्ष देत असल्यामुळे यापुढेही असेच अनेक नवनवीन प्रकार ग्राहकांसाठी देण्याचा आमचा मानस असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

अनेक अडीअडचणींवर मात करत मला या व्यवसायात यशस्वी होण्यास माझ्यावर आई-वडिलांनी केलेले संस्कार उपयोगी पडले. तसेच माझे गुरु, श्री. आनंदभाई व कै. सौ. आशाताई गुजराथी यांनी तितक्याच प्रेमाने लावलेली शिस्त, वेळेचे नियोजन, व्यवहारातील प्रामाणिकपणा, दर्जेदार माल विकण्याची सवय, प्रसंगी स्वत:चे नुकसान झाले तरी चालेल, परंतु खोटे बोलून ग्राहकांची फसवणूक करायची नाही, अशा शिकवणुकीमुळेच मी आज हे यशाचे शिखर गाठू शकलो, असे कुलकर्णी यांनी नमूद केले.

‘मनींचे संकल्प, सिद्धीस जाई, जरी राहे बुद्धी स्वामींचे पायी....’ या संतवचना प्रमाणे, स्वामी समर्थांचे कृपेने आजपर्यंतची झालेली माझी आर्थिक, व्यावसायिक, कौटुंबिक प्रगती स्वामींचेच चरणी नतमस्तक होऊन अर्पण करत असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

संतोष रमेशराव कुलकर्णी, उद्योजक
मोबाईल नं. -  ९८५०८ ८३३०४

SAKAL READER CONNECT INITIATIVE

Edited By - Prashant Patil

loading image
go to top