पुणेकरांनो, सातारा रस्त्यावर आजपासून ‘बीआरटी’

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 February 2021

कात्रज-स्वारगेट मार्गावर या पूर्वी सुरू झालेल्या बीआरटीआला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु, रस्त्याची पुनर्रचना करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू होते. अखेर आता शुक्रवारपासून बीआरटी सुरू होणार आहे. 

पुणे - सातारा रस्त्यावरील बस रॅपिड टान्झिट (बीआरटी) आता अखेर आज (शुक्रवार)पासून सुरू होणार असल्याची घोषणा पीएमपीने केली. या मार्गातून बस आणि रुग्णवाहिकेखेरीज अन्य वाहनांना प्रवेश नसेल. सुमारे साडेपाच किलोमीटरच्या बीआरटी मार्गातून प्रतिदिन सुमारे तीन हजार बस फेऱ्या होणार आहेत. 

बारामतीत डझनभर पिस्तुले जप्त; पिस्तुलांचं MP कनेक्शन आलं उजेडात!

सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्गाचे नूतनीकरण अनेक महिन्यांपासून रखडले होते. उभारलेल्या स्थानकांचीही दुरवस्था झाली होती. या पार्श्वभूमीवर बीआरटी सुरू करण्यासाठी महापालिकेने तयारी पूर्ण केली आहे. त्यानुसार पीएमपीच्या बस शुक्रवारी सकाळपासून कात्रज चौक ते जेधे चौका दरम्यान बीआरटी मार्गातून धावणार आहेत, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली. 

परीक्षेसाठी कोर्टानं मंजूर केला जामीन; कोंबड्या चोरल्याच्या गैरसमजातून केला होता जीवघेणा हल्ला​

बीआरटी मार्गात खासगी वाहनांनी प्रवेश करू नये म्हणून या मार्गावर ३० सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात येईल. त्यांच्या मदतीला वाहतूक पोलिसही तैनात करण्यात येणार आहेत. तसेच बीआरटी मार्गात प्रवाशांची चढ-उतार सुरक्षितपणे व्हावी, यासाठी मार्गातील १० थांब्यांवर दोन शिफ्टमध्ये पीएमपीचे अधिकारी व आणि कर्मचारी थांबणार आहेत. 

असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास

शहरात २००५-०६ मध्ये हडपसर-स्वारगेट-कात्रज मार्गावर बीआरटी कार्यान्वित झाली. त्यानंतर शहरातील ८ रस्त्यांवर बीआरटी सुरू झाली. शहरात सुमारे ११० किलोमीटरचे बीआरटीचे जाळे कार्यान्वित करण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. प्रत्यक्षात बीआरटीचे मार्गही वाढले नाहीत. 

Fact Check: खरंच अण्णा हजारेंचा भाजप प्रवेश झालाय? जाणून घ्या सत्य

सध्या मर्यादित स्वरूपात बीआरटी सुरू आहे. कात्रज-स्वारगेट मार्गावर या पूर्वी सुरू झालेल्या बीआरटीआला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. परंतु, रस्त्याची पुनर्रचना करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू होते. अखेर आता शुक्रवारपासून बीआरटी सुरू होणार आहे. 

हे होणार फायदे 
प्रवासाचा वेळ कमी होणार 
बस त्वरित उपलब्ध होणार 
वाहतूक कोंडी कमी होणार 
प्रदूषणाची पातळी कमी होणार 
ज्येष्ठ नागरिकांचीही सुरक्षितपणे बसमध्ये चढ-उतार होणार 

मार्गाबद्दल...
४७ - एकूण मार्ग
२२३  - बस धावणार
२९४६  - बसच्या फेऱ्या होणार
२,१८,५२७ - अपेक्षित प्रवासी संख्या


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BRT started on Katraj-Swargate route satara road