बीएस-6 प्रणालीची वाहने लवकर रस्त्यांवर धावणार : पर्यावरणमंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prakash-Javadekar

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तीन मार्गावरील मेट्रोमार्गाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल.

बीएस-6 प्रणालीची वाहने लवकर रस्त्यांवर धावणार : पर्यावरणमंत्री

पुणे : देशातील वाहनांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून बीएस-6 या प्रणालीची वाहने बाजारपेठेत आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी (ता.14) सांगितले. यासाठी केंद्र सरकारने 60 हजार कोटी रुपयांचा खर्च केले आहेत. यासाठी बीएस-4 या प्रणालीची वाहने बंद करण्यात येणार असल्याचेही
त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची (दिशा) सभा आज (ता.14) जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला खासदार गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार अमर साबळे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदींसह शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- आश्चर्य:'तो' उसेन बोल्टपेक्षा वेगानं धावतो; 9.55 सेकंदांत गाठले 100 मीटर

जावडेकर म्हणाले, ''पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रोची मदत होणार आहे. त्यामुळे या कामांसाठी केंद्र सरकार आवश्‍यक तो निधी उपलब्ध करून देईल. ही कामे वेगाने पूर्ण होण्याची गरज आहे. हिंजवडी, वाघोलीसह शहरात गजबजलेल्या बऱ्याच भागात वाहतूक समस्या
भेडसावत आहे. या वाहतूक समस्येवर उपाययोजना करणे अनिवार्य आहे.

- Pulwama Attack : 'मी भाग्यशाली...' वीरेंद्र सेहवागची पोस्ट होतेय व्हायरल!

दरम्यान, माध्यान्ह भोजन योजनेमुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. हे या योजनेचे यश आहे. याच्या जोडीलाच प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शुद्ध हवा, स्वच्छ पाणी मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन व कचऱ्याच्या वर्गीकरणावर भर दिला पाहिजे.''

या बैठकीत केंद्र पुरस्कृत पंतप्रधान मुद्रा योजना, मेट्रोच्या कामाची सद्यःस्थिती, माध्यान्ह भोजन, अंगणवाडी पूरक पोषण आहार, शहर आणि उपनगरांतील कचरा व्यवस्थापन, रेल्वे स्टेशनवरील वाय-फाय सुविधा, आयुष्यमान भारत योजना आणि समग्र शिक्षण मोहीम आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.

- सावरकरांपेक्षा अण्णाभाऊ साठेंना द्या भारतरत्न : इम्तियाज जलील 

'स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पुण्यात मेट्रो धावेल'

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तीन मार्गावरील मेट्रोमार्गाचे काम मार्च 2022 पर्यंत पूर्ण होईल. यामुळे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात या तीनही मार्गावरून मेट्रो धावेल, असे मत केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केले.