esakal | इंदापुर तालुक्यात बुलेट ट्रेनच्या चर्चेला उधाण

बोलून बातमी शोधा

bullet train
इंदापुर तालुक्यात बुलेट ट्रेनच्या चर्चेला उधाण
sakal_logo
By
राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : इंदापूर व बारामती तालुक्यातून मुंबई-पुणे-हैदराबाद बुलेट ट्रेन जाणार असून याचे सर्वेक्षण सुरु असल्याच्या चर्चेला दिवसभर उधाण आले होते. मात्र प्रशासनाकडून बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या माहिती मिळाली नाही. देशामध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे. केंद्र सरकारचा मुंबई-पुणे- हैदराबाद ही बुलेट ट्रेनचा प्रकल्प प्रस्तावित असून याचे सर्वेक्षणासाठी काम इंदापूर तालुक्यात सुरु झाले असल्याची आज दिवस चर्चा होती. मात्र याला प्रशासनाने दुजोरा दिला नाही.

हेही वाचा: प्रेमाला अडथळा निर्माण झाल्याने प्रेमीयुगलांनी गाठले पुणे

सदरचा सर्वेक्षणासाठी इंदापूर तालुक्यातील सणसर गावाजवळ एक खांब उभारण्यात येणार आहे. यासाठीचे काम सुरु असल्याची माहिती नागरिकांनी मिळाल्यानंतर सणसरमधील नागरिकांनी कर्मचाऱ्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी बुलेट ट्रेन च्या हवाई सर्वेक्षणासाठी हा पिलर उभा करण्यात येत असल्याची माहिती दिली. सदरचा प्रकल्प महाराष्ट्र आणि गुजरात सरकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात सणसर ग्रामपंचायत सदस्य अभयसिंह निंबाळकर यांनी सांगितले की, सणसर जवळी खड्डा खोदून एक खांब उभारण्याचे काम सुरु होते. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की, मुंबई-पुणे-हैदराबाद अशी बुलेट ट्रेन प्रस्तावित आहे. याचे हवाई सर्वेक्षण करण्यात येणार असून यासाठी खांब उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. सदरचे सर्वेक्षण मे महिन्या अखेरीस पूर्ण करुन अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर करण्याचे निर्देश हाय स्पीड रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती निंबाळकर दिली आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

यासंदर्भात पुणे जिल्हाचे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही. बारामतीचे प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे व इंदापूरचे प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी सांगितले की, याबाबतची माहिती प्रांत व तहसील कार्यालयाकडे उपलब्ध नाही.