esakal | बंगाली कारागिरांअभावी राज्यात सराफ बाजारपेठा अडचणीत: मुंबई, पुण्याची काय आहे स्थिती?

बोलून बातमी शोधा

The bullion market in the state are in trouble due to lack of Bengali artisans

सोन्याचे दागिने घडविण्यात बंगाली कारागिरांचा हातखंडा आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे राज्यातून एक लाख बंगाली कामगार परतण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी 40 रेल्वेगाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच रोडवरून प्रवास करून परतणाऱया कामगारांचीही संख्या मोठी आहे.

बंगाली कारागिरांअभावी राज्यात सराफ बाजारपेठा अडचणीत: मुंबई, पुण्याची काय आहे स्थिती?
sakal_logo
By
मंगेश कोळपकर

पुणे : सराफ बाजारात सध्या हुकमी समजले जाणारे बंगाली कारागीर मोठ्या संख्येने परत जात असल्यामुळे मुंबई, पुणे, नागपूर, जळगाव आदी सराफ बाजारपेठांवर नजीकच्या काळात त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या क्षेत्रातील मराठी कारागिरांचा टक्का वाढला तर ही कसर भरून निघेल, असा होरा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सोन्याचे दागिने घडविण्यात बंगाली कारागिरांचा हातखंडा आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे राज्यातून एक लाख बंगाली कामगार परतण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. त्यासाठी 40 रेल्वेगाड्यांची नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच रोडवरून प्रवास करून परतणाऱया कामगारांचीही संख्या मोठी आहे. या कामगारांमध्ये सराफ बाजारांतील कारागिरांचे प्रमाण सर्वाधिक असून त्या खालोखाल बांधकाम, हॉटले, कारखाने आदींमधील कामगारांचे प्रमाण आहे, असेही पश्चिम बंगालमधील प्रिन्सिपिल सेक्रेटरी संजय थाडे यांनी सांगितले.

पुण्यात गुंडाराज ; वर्चस्ववादातून लाॅकडाउनमधील तिसरा खून

राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, सांगली, कोल्हापूर येथे सोन्याच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. मुंबईतून तर राज्यातच नव्हे तर, देशात सोन्याचे दागिने वितरीत होतात. मुंबईतील झवेरी बाजार आणि परिसरात सोन्याचे दागिने घडविण्याचे सुमारे 5 हजार कारखाने असून तेथे सुमारे 70 टक्के कारागीर हे बंगाली आहेत. येथे घडविलेले दागिने वितरकांमार्फत लहान-मोठ्या दुकानांत विक्रीसाठी जातात. मात्र, आता तेथे पुरेसे कारागीर नसल्यामुळे दागिने घडविण्यावर काही मर्यादा येतील आणि पुरवठ्याही विपरित परिणाम होईल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

पुणेकरांनो,पुढचे २ दिवस घरातच राहा कारण..

पुणे- नागपूरमध्येही प्रत्येकी सुमारे 30 ते 40 हजार कारागीर आहेत. लहान-मोठ्या बाजारपेठांतही या कारागिरांची संख्या मोठी आहे. बंगाली कारागीर नक्षीचे तसेच हातकाम, पॉलिश काम कुशलतेने करतात. एका बंगाली मुखियाकडे किमान 10 ते 20 कारागिरी असतात. पूर्णवेळ ते दागिने घडविण्याचे काम करीत असल्यामुळे
त्यांचा कामाचा वेग जास्त असतो. त्यामुळेच त्यांच्याकडे ऑर्डरही मोठ्या संख्येने येतात. सोन्याची किरकोळ विक्री करणाऱया दुकानांत ग्राहक त्यांच्याकडील सोने देतात आणि त्यातून दागिने घडविले जातात. हे दागिने घडविणारेही बहुतेक बंगाली कारागिरी आहेत. त्यामुळे तयार दागिने आणि घडवून घेणाऱया दागिन्यांचे व्यवहारही आता अडचणीत येण्याची भीती सराफ व्यावसायिकांना आहेत.

आम्हाला धान्य कधी मिळणार? लॉकडाऊन संपल्यावर... : संतप्त नागरिकांचा सवाल

कोरोनाच्या भीतीमुळे हे कारागीर परतत आहेत. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर, गुजरात, राजस्थान, दिल्लीतूनही हे कारागीर बंगालमध्ये येत आहेत. दोन महिन्यांत कोरोनाची परिस्थिती निवळली तर, गणेशोत्सवापूर्वी परतण्यास त्यांच्याकडून सुरवात होईल, असाही अंदाज या क्षेत्रातून वर्तविण्यात येत आहे. मराठी कारागीरही आहेत. परंतु, बंगाली कारागिरांच्या तुलनेत त्यांचा टक्का कमी आहे. त्यात वाढ झाली तर, त्यांनाही व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असेही सराफ व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

खवय्ये पुणेकरांनो, ऐकलंत का? आपलं `वैशाली` हाॅटेल सुरू झालयं

''बंगाली कारागिरांची मुंबईतच संख्या किमान दोन लाखांची आहे. तसेच राज्यांतील अनेक शहरांत त्यांचे अस्तित्त्व ठळक आहे. दिवसातून सुमारे 15 तास ते काम करतात. त्यांच्याकडे व्यवसायही मोठा आहे. हे कारागीर कुशल आहेत. त्यामुळे त्यांची कमी
झालेली संख्या बाजारपेठेवर नक्कीच परिणाम होईल.''
- फत्तेचंद रांका (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन) 

दाव्याची पहिली पायरी होतेय स्मार्ट; वाचा सविस्तर

''मुंबईतील बंगाली कारागीर मोठ्या संख्येने परतला आहे. त्याचा लगेचच नाही पण, अल्पावधीतच परिणाम बाजारपेठेत नक्कीच जाणवेल. या काळात मराठी कारागिरांना संधी आहे. पण, त्यांनीही तसा प्रतिसाद द्यायला हवा. गणेशोत्सवानंतर सण सुरू होतात, त्यावेळी बाजारपेठेत ते परततील. कारण पश्चिम बंगालमध्ये तरी ते किती काळ थांबणार.''
- सुधीर पेडणेकर (अध्यक्ष, मुंबई सुवर्णकार संघ)  ​

Big Breaking : विद्यापीठ चाैकातील ते दोन पूल पाडण्याबाबत झाला मोठा निर्णय
''सराफ बाजारपेठेत बंगाली कारागिरांचा सध्या वरचष्मा आहे. ग्राहकाने दाखविलेल्या किंवा त्याला हव्या असलेल्या डिझाईननुसार बंगाली कारागीर हमखास दागिने घडवितो. तसेच नक्षीकाम, हातकाम, पॉलिश यामध्ये ते कुशल आहेत. त्यामुळे अनेक सराफ व्यावसायिक त्यांच्यावर अवलंबून असतात. ते परतल्यामुळे दागिन्यांच्या उत्पादनांवरही परिणाम होणार आहे.''
- पद्मजा संभूस (सराफ व्यावसायिक)