esakal | 25 कोटी कर्जाच्या नादात व्यावसायिकाने गमावले दिड कोटी रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

Money

व्यावसायिकाला 25 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून व्यावसायिकाकडून एक कोटी 52 लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

25 कोटी कर्जाच्या नादात व्यावसायिकाने गमावले दिड कोटी रुपये

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - व्यावसायिकाला 25 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचा बहाणा करून व्यावसायिकाकडून एक कोटी 52 लाख रुपये घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी सोमनाथ ज्ञानदेव माने (वय 33, रा. घोरपडी) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पंकज पांडे, जयंत गायकवाड, सात्त्विक चंद्रशेखर, अविनाश गुराप्पा व समीर मोहम्मद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पंकज पांडे व जयंत गायकवाड यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घोरपडी येथे राहात असून त्यांचा टॅक्‍स अँड बिझनेस कन्सल्टन्सीचा व्यवसाय आहे.

लोणावळ्यात पर्यटकांची विकेंडला फुल्ल गर्दी!

माने व पांडे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांना त्यांच्या व्यवसायासाठी 25 कोटी रुपयांची आवश्‍यकता होती. याबाबतची माहिती पांडे याला समजली. त्यानंतर पांडे याने फिर्यादीशी संपर्क साधून अन्य आरोपींसोबत त्यांची ओळख करून दिली. संबंधित आरोपींनी चेन्नई येथील वित्तपुरवठा कंपनीकडून 25 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देतो, असे फिर्यादी यांना आमिष दाखविले. कर्ज मिळवून देण्यासाठीची प्रक्रिया व आगाऊ व्याज म्हणून फिर्यादी यांच्याकडून आरोपींनी वेळोवेळी एक कोटी 52 लाख रुपये घेतले. त्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्याकडे कर्ज मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला, मात्र आरोपींकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली.

पिंपरी चिंचवडमध्ये एका पोलिस उपायुक्तांची बदली; 3 सहायक आयुक्तांची नियुक्ती

Edited By - Prashant Patil

loading image
go to top