
पुणे : केईएम हॉस्पिटल पुणे येथे मेंदूमृत (ब्रेनडेड) घोषित झालेल्या ४६ वर्षीय कॅबचालकाच्या अवयवदानामुळे सहा जणांना नवजीवन मिळाले. मेंदूमृत रुग्णाचे हृदय मुंबईच्या एका रुग्णालयात पाठविले. एक मूत्रपिंड केईएम हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपित केले; तर दुसरे मूत्रपिंड, यकृत आणि कॉर्निआ पुण्यातील इतर रुग्णालयात पाठविले.