पार्किंग शुल्कचा निर्णय रद्द करा; अन्यथा रविवारपासून मार्केटयार्ड बंद

बाजार समितीने खरेदीसाठी येणार्‍या तीन चाकी वाहनासाठी ५० रुपये, चार चाकी वाहनासाठी १०० पार्किंग शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पार्किंग शुल्कचा निर्णय रद्द करा; अन्यथा रविवारपासून मार्केटयार्ड बंद

मार्केट यार्ड - बाजार समितीने खरेदीसाठी येणार्‍या तीन चाकी वाहनासाठी ५० रुपये, चार चाकी वाहनासाठी १०० पार्किंग शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला बाजारातील अडते, टेम्पो संघटना, कामगार संघटना आणि खरेदीदारांनी विरोध केला आहे. निर्णय शुक्रवारपर्यंत रद्द न केल्यास येत्या रविवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय या सर्व घटकांनी घेतला आहे.

बाजारातील विविध संघटना, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील किरकोळ खरेदीदारांची संयुक्त बैठक मंगळवारी प्रशासक मधुकांत गरड यांच्यासमवेत पार पडली. या बैठकीत पार्किंग शुल्क आकारणीबाबत चर्चा झाली. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने सर्व घटक बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पीकअप वाहन चालक सागर चोपडे म्हणाले, “वाराई आता डागाप्रमाणे सुरू केली आहे. संपूर्ण वाराई 480 रुपये झाली. मी आधी त्यांना वाराई 220 रुपये देत होतो. तसेच बाजार समितीने शंभर रुपये पार्किंग शुल्क आकारले आहे. त्यामुळे हे मला परवडत नाही. वारणार आधी माल व्यवस्थित लावत होते. तसेच मालक चोरी जाण्याची जबाबदारी ही ते घेत होते. त्यांच्या सोयीनुसार ते गाडी पार्किंग हि करत होते. परंतु आज मला गाडी लावण्यास खूप त्रास झाला.'

पार्किंग शुल्कचा निर्णय रद्द करा; अन्यथा रविवारपासून मार्केटयार्ड बंद
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेच्या आठवणीला उजाळा....

मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रशासक मधुकांत गरड फळविभाग प्रमुख बाबासाहेब बिबवे, भाजीपाला विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर, अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष अमोल घुले, सचिन पायगुडे, राजेंद्र कोरपे, टेम्पो संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे, राजू रेणूसे, कामगार संघटनेचे विजय चोरगे, नितीन जामगे, विलास थोपटे, संजय साष्टे, तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरगे, खरेदीदार सुनील शिंदे, देवेंद्र कोळेकर, भागवत बिराजदार, नागनाथ कोठावळे यांच्यासह खरेदीदार, टेम्पो चालक, अडते, व्यापारी, कामगार उपस्थित होते.

यासाठी टेम्पो चालकांकडून पार्किंग शुल्क घेणार

फळे, भाजीपाला विभागातून दररोज एक हजार ते पंधराशे टेम्पोमधून शेतीमालाची आवक होते. हा माल खरेदीसाठी शहर, उपनगर, ग्रामीण आणि शेजारच्या जिल्ह्यातून तब्बल तीन ते चार हजार वाहने दररोज मार्केट यार्डात येतात. तीन चाकी आणि चार चाकी टेम्पोकडून अनुक्रमे 100 ते अडीचशे रुपये कसलीही पावती न देता पार्किंग आणि वाराईच्या नावावर वसुल करत असल्याचे बाजार समितीच्या प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही प्रथा मोडीस काढण्यासाठी वाहतुकीसाठी आडथळा निर्माण न होता पार्किंगला जागा उपलब्ध करून देऊन तीनचाकीसाठी 50 आणि चारचाकीसाठी १०० रुपये (प्रती दोन तास) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करून पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार समितीचे परवानाधारक हमाल पावती देऊन ही रक्कम स्विकारणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

पार्किंग शुल्कचा निर्णय रद्द करा; अन्यथा रविवारपासून मार्केटयार्ड बंद
'विघ्नहर'ला देश पातळीवरील तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार

पार्किंग शुल्काचा निर्णय रद्द करण्याची विनंती आम्ही बाजार समिती प्रशासनाला केली आहे. प्रशासनाने निर्णय रद्द न केल्यास आमचा बंद कायम असणार आहे. बाजारात खरेदीसाठी येणारा टेम्पो चालक सेस, लेव्ही आणि आडत भरत असतो. असे असतानाही पुन्हा त्यासाठी अतिरिक्त पार्किंग शुल्क आकारणे चुकीचे ठरेल.

- विलास भुजबळ, अध्यक्ष, अडते असोसिएशन.

चर्चेसाठी आज पुन्हा बैठक

टेम्पोच्या पार्किंग शुल्काबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी प्रशासक मधुकांत गरड यांनी आडते, कामगार, व्यापारी प्रतिनिधींची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत शुल्क आकारणीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीत सकारात्मक निर्णय झाल्यास पुकारण्यात आलेला बंद मागे घेण्यात येईल, अन्यथा बंद कायम असणार आहे.

- संतोष नांगरे, अध्यक्ष, टेम्पो संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com